Bathroom Tiles Cleaning: बाथरूमच्या टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये काळी-पिवळी घाण साचलेली आहे? वापरा या सोप्या क्लिनिंग ट्रिक्स

Bathroom Tiles Cleaning: बाथरूमच्या टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये काळे-पिवळे डाग साचलेत? टूथब्रश, टाईल क्लीनर आणि सोप्या स्वच्छतेच्या सवयींच्या मदतीने बाथरूम स्वच्छ ठेवण्याचे प्रभावी उपाय जाणून घ्या.
Bathroom Tiles Cleaning
Bathroom Tiles Cleaningएोोस ऊन
Published On: 

घर कितीही स्वच्छ ठेवले तरी बाथरूमच्या टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये काळे आणि पिवळे डाग साचतात. विशेषतः दोन टाईल्सच्या मधल्या सांध्यांमध्ये आणि भिंतीच्या कोपऱ्यांमध्ये घाण खूप साचते. त्यामुळे नव्या आणि चमकदार टाईल्सही जुन्या आणि अस्वच्छ दिसू लागतात. अनेकजण हे डाग काढण्यासाठी महागड्या केमिकल क्लीनर्सचा वापर करतात. मात्र, काही वेळा वारंवार स्वच्छता करूनही हे डाग पूर्णपणे निघत नाहीत. या बाथरुमच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात, हे जाणून घेऊयात.

बाथरूमच्या टाईल्सवर काळे-पिवळे डाग का पडतात?

बाथरूममध्ये पाणी आणि साबणाचा वापर सतत होत असतो. त्यामुळे टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये आणि दोन टाईल्सच्या मधल्या जागेत साबणाचा चिकट थर, धूळ आणि घाण साचते. तसेच पाण्यातील खनिजांमुळे टाईल्सवर पांढरे, पिवळसर डाग दिसू शकतात. बाथरूममध्ये सतत ओलावा राहिल्यास काही ठिकाणी बुरशीही वाढू शकते. त्यामुळे टाईल्सचे कोपरे काळपट दिसू लागतात.

हट्टी डागांसाठी वापरा टाईल क्लीनर

बऱ्याच दिवसांपासून साचलेले काळे आणि पिवळे डाग साध्या पाण्याने निघत नाहीत. अशावेळी टाईल्स आणि बाथरूमसाठी योग्य असलेल्या क्लीनरचा वापर करता येतो. क्लीनर लावल्यानंतर काही वेळ थांबा. त्यानंतर ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. क्लीनर वापरताना हातमोजे घाला आणि बाथरूममध्ये हवा खेळती ठेवा.

आंघोळीनंतर टाईल्सवरील पाणी पुसून घ्या

बाथरूममध्ये सतत ओलावा राहिल्यामुळे टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये घाण आणि बुरशी जमा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर टाईल्सवरील पाणी वायपर किंवा सुक्या कापडाच्या मदतीने पुसून घ्या. शक्य असल्यास बाथरूमची खिडकी उघडी ठेवा किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा. यामुळे बाथरूममधील ओलावा कमी होण्यास मदत होते.

आठवड्यातून एकदा करा कोपऱ्यांची स्वच्छता

बाथरूमच्या टाईल्सवर काळा थर साचू नये यासाठी आठवड्यातून एकदा कोपरे आणि टाईल्सचे सांधे स्वच्छ करा. साबणाचा थर आणि धूळ वेळच्या वेळी काढल्यास हट्टी डाग तयार होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच बाथरूम कोरडे आणि हवेशीर ठेवण्याची सवय लावा. नियमित स्वच्छतेमुळे टाईल्सची चमक टिकवून ठेवण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.