Toilet Cleaning Trick: फ्रिजमधील बर्फ टॉयलेटमध्ये टाका, ५ मिनिटांत होईल चमत्कार; व्हायरल ट्रिक तुम्हाला माहितेय?

Cleaning Hack: तुमच्या टॉयलेटमधले डाग कमी होत नसतील तर तुम्ही पुढील सोपी ट्रीक फॉलो करू शकता. पुढे सोशल मीडियावर व्हायरल होणारी ट्रीक समजून घेऊयात.
toilet stain removal
toilet stain removalgoogle
Published On

आपल्या रोजच्या जीवनशैलीतली एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे आपलं पोट साफ करणे. पण पोट साफ करण्याआधी आपण ती जागा स्वच्छ आहे का? हे तपासलं पाहिजे. जर ती जागाच अस्वच्छ असेल तर तुम्हाला इनफेक्शन आणि अस्वच्छतेमुळे काही आजारांनाही सामोरं जावं लागतं. पुढील बातमीत आपण सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक भन्नाट ट्रीक पाहणार आहोत.

ज्यामुळे तुमच्या टॉयलेटमधील हट्टी डाग निघून जातील. तसेच तुम्ही टॉयलेट क्लिन करण्यासाठी महागड क्लिनर वापरत असाल आणि ते नाल्यातून लगेच बाहेर जात असेल तर बर्फाची ही ट्रीक खूप बेस्ट आहे.

toilet stain removal
Eye Glasses Clean Tips: चष्म्यावर स्क्रॅच आलेत? मग या ७ सोप्या ट्रिक्स करा फॉलो, नव्यासारख्या दिसतील काचा

बर्फाच्या तुकड्यांनी क्लिनरला पृष्ठभागाववर चिकटून राहतात आणि फ्लश करताना ब्रशप्रमाणे हलकं घर्षण निर्माण करतात. त्याने टॉयलेट नेहमीच चकचकीत दिसतं.

बर्फाचा वापर नेमका कसा करायचा?

सगळ्यात आधी तुमच्या फ्रीझरमधून २ कप बर्फाचे तुकडे घ्या. ते थेट टॉयलेटच्या भांड्यात टाका. नंतर त्यावर टॉयलेट क्लिनर किंवा पांढरं व्हिनेगर ओता. बर्फ क्लिनरला अडवून ठेवतं. त्यामुळे ते भांड्याच्या कडांना व्यवस्थित चिकटतं. क्लिनरला त्याचं काम करू देण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतील. मग तुम्ही फ्लश करा. ही सोपी स्टेफ फॉलो करून तुम्ही तुमचं टॉयलेट क्लीन करू शकता. यामध्ये तुम्ही बर्फाचे खूप मोठे मोठे तुकडे वापरू नका. कारण ते पाईपमध्ये अडकू शकतात. छोटे तुकडे लगेच वितळतात. याने फ्लश सिस्टीमचं नुकसान होत नाही.

जर तुमच्या टॉयलेटवर बऱ्याच महिन्यांपासून हट्टी पिवळे किंवा तपकिरी रंगाचे डाग असतील, तर फक्त बर्फाने ते निघत नाहीत. अशावेळी, तुम्हाला रोजचा जाडसर ब्रश आणि चांगल्या क्लिनरचा वापर करून घासावं लागेल.

toilet stain removal
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद का झाले? या ठिकाणी कळणार कारणं, फक्त १ गोष्ट करावी लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com