Copper Bottle : तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिताय? आतून खराब झालीये? 3 स्टेपमध्ये करा मिनिटात स्वच्छ

Copper Bottle Benefits : तांब्याची बॉटल नेहमी स्वच्छ साफ करावी.
Copper Bottle
Copper BottleSaam Tv
Published On

How To Clean Copper Bottle

पाणी पिण्यासाठी अनेकजण तांब्याच्या बॉटलचा वापर करतात. तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते. तांबे हा खनिजांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. परंतु ही बॉटल रोज वापरल्यावर ती योग्य पद्धतीने साफ केली पाहिजे अन्यथा तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिणे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर तेवढेच ती बॉटल व्यवस्थित साफ न केल्यास विकार होऊ शकतात. तांब्याची बॉटल साफ करताना एक सोपी ट्रिक वापरायची आहे. बॉटल कशी साफ करावी याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तुम्हाला लिंबू, मीठ आणि गरम पाणी वापरुन तांब्याची बॉटल साफ केल्याने बॉल स्वच्छ साफ होते. त्यातील जंतू नाहीसे होतात. सोशल मीडियावर priya_dwarke या अकाउंटवरुन तांब्याची बॉटल कशी साफ करावी याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सर्वप्रथम तांब्याच्या बॉटलमध्ये उकळलेले गरम पाणी टाका. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मीठ टाका. यानंतर बॉटलचे झाकण बंद करुन तासभर ठेवा. यानंतर बॉटलमधील पाणी काढून ती स्वच्छ धुवून घ्या. एका लांब ब्रशच्या साहाय्याने ही बॉटल धूवावी. जेणेकरुन त्यातील जंतू साफ होतील.

तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिल्यास शरीराला खूप फायदा होतो. त्यामुळे शरीरात आयन आणि हिमोग्लोबीन तयार होण्यास मदत होते. तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिल्यास पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटाचे विकार होत नाही. तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि आराम देण्यास मदत करते. याचबरोबर तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिल्यास त्वचेलाही फायदा होतो. त्वचा अगदी तजेलदार आणि निरोगी राहते.

Copper Bottle
Navratri Diet Plan : नवरात्रीच्या उपवासात या पदार्थांचा करा आहारात समावेश, वजन कमी करण्यासोबतच मिळतील शरीराला अनेक फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com