Clean Copper And Brass Utensils : तांबे-पितळेची भांडी मिनिटांत चमकू लागतील; या पद्धतीने करा साफ

How To Clean Copper And Brass Utensils : तांबे पितळेची भांडी स्वच्छ करण्याची ही पद्धत आजवर तुम्हाला कुणीही सांगितली नसेल.
Clean Copper And Brass Utensils
Clean Copper And Brass UtensilsSaam TV
Published On

तांबे आणि पितळेची भांडी आता जुनी होत चालली आहेत. या धातुंची भांडी काही घरातून तर नाहीशी झालीत. भांडी घासण्याचा कंटाळा म्हणून घराघरात झटपट स्वच्छ होणारी स्टिलची भांडी आली आहेत. स्टिलची भांडी साफ करणे अगदी सोपे असते. मात्र तांबे आणि पितळेच्या भांड्यांमधील पाणी आणि जेवण याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

तांबे-पितळेची भांडी घासणे थोडं कठीण आहे. या भांड्यांवर सतत काळा थर साठून राहतो. काळा थर जमा झाल्यावर भांडी चांगली दिसत नाहीत. त्यामुळे आज काही मिनिटांत तांबे आणि पितळेची भांडी लख्ख कशी चमकवायची याची माहिती जाणून घेणार आहोत.

Clean Copper And Brass Utensils
Bedroom Cleaning Tips : बेडरूमच्या कपाटातून या ५ वस्तू आजच बाहेर फेका; तेव्हाच घर स्वच्छ झालं म्हणता येईल

मिठ आणि लिंबू

लिंबामध्ये सॅट्रीक अॅसीड असतं. त्यामुळे त्याने तांबे पितळेच्या भांड्यांवर प्रक्रिया होते. मिठ आणि लिंबू एकत्र घेऊन तुम्ही ते भांड्यांवर घासू शकता या टिप्सने भांडी स्वच्छ निघतात.

टूथपेस्ट

टूथपेस्ट सुद्धा भांडी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी सर्वात आधी वाटीत टूथपेस्ट घ्या. टूथपेस्टमध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. त्यानंतर यात पाणी टाकून पातळ पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही भांड्यावर अप्लाय करून ठेवू शकता. त्यानंतर १० मिनिटांनी भांडी धुतल्यास त्याचे काळे डाग निघून जातात.

चिंच

पितळ आणि तांबे या धातूची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी आधी चिंच पाण्यात भिजत ठेवा. चिंच भिजल्यावर त्यात व्हिनेगर मिक्स करा. व्हिनेगर मिक्स केल्यावर तु्म्हाला आणखी सोपे जावे म्हणून मिक्सरला याची थिक पेस्ट बनवून घ्या. अशा पद्धतीने चिंच आणि व्हिनेगरने तांबे आणि पितळेची भांडी अगदी चमचकीत चमकतील.

तांबे -पितळेची भांडी काळी का पडतात?

पितळ आणि तांब्याच्या संपर्कात हवा आल्यावर या धातुंचे ऑक्सिडीकरण होते. तसेच यावर काळा थर तयार होतो. या काळ्या थराला पेटिना असं म्हणतात.

Clean Copper And Brass Utensils
House cleaning tips: घर स्वच्छतेसाठी स्वयंपाक घरातल्या 'या' 5 वस्तू वापरून तर पहा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com