Bedroom Cleaning Tips : बेडरूमच्या कपाटातून या ५ वस्तू आजच बाहेर फेका; तेव्हाच घर स्वच्छ झालं म्हणता येईल

How to Clean Your Bedroom : दसरा आणि दिवाळी सुरू होण्याआधी साफसफाई करताना या वस्तू सुद्धा घरातून बाहेर फेकून द्या. सणउत्सव आनंदात साजरे होतील.
How to Clean Your Bedroom
Bedroom Cleaning Tips Saam TV
Published On

घरोघरी आणि मंडळांमध्ये लवकरच देवींची स्थापना होणार आहे. माता राणीच्या सेवेनंतर लगेचच दसरा आणि पुढे दिवाळीला सुरुवात होईल. सणासुदीच्या दिवसांत व्यक्ती आपल्या घराची साफसफाई करतात. साफसफाई करताना तुम्ही घरातील पंखे, देव्हारा आणि मोठं फर्निचर साफ करत असाल. मात्र त्यासह तुमच्या बेडरूममधील कपाट देखील साफ करणे गरजेचं आहे. कपाटात अशा अनेक वस्तू असतात ज्या आपल्या घराची शोभा घालवतात.

वापरता न येणारे कपडे

दिवसेंदिवस आपल्या शरीराचा आकार बदलत जातो. व्यक्तीचं वजन आणि उंची वाढत जाते त्यामुळे आपल्याकडे असलेले कपडे आपल्याला काही दिवसांनी बारीक होतात. कपडे बारीक झाल्यावर ते अंगात निट बसत नाहीत. त्यामुळे असे कपडे घरामध्ये तसेच पडून राहतात. कपडे बारीक झाल्यावर आपण नवीन कपडे खरेदी करतो मात्र जुने अंगात न येणारे कपडे कपाटात तसेच राहतात. त्यामुळे सर्वात आधी असे कपडे बाहेर फेकून द्या.

How to Clean Your Bedroom
Viral Video: लाईक्ससाठी काहीही! बाप-लेकीने बेडरुममध्ये केले असे कृत्य; नेटकऱ्यांचा संताप अनावर | VIDEO

खराब आणि तुटलेल्या वस्तू

सुंदर कपडे परिधान केल्यानंतर आपल्याला त्यावर मॅचींग ज्वेलरी सुद्धा हवी असते. मात्र ज्वेलरी जेव्हा जी पाहिजे तेव्हा ऐनवेळी ती मिळत नाही. त्यामुळे कपाटात असलेल्या ज्वेलरी बॉक्सची सफाई करा. यात फक्त तुम्हाला आवडत असलेल्या ज्वेलरी ठेवा. तसेच बाकीच्या ज्वेलरी तुम्ही अन्य काही मुलींना सुद्धा देऊ शकता. त्यासह ज्वेलरी बॉक्समध्ये अनेकदा कानातल्याता एकच जोड असतो. दुसरं कानातलं हरवलेलं असतं. त्यामुळे असे कानातल्याचे जोड सुद्धा फेकून द्या.

एकाच पायातील सॉक्स

सॉक्स खरेदी करताना आपण ते जोडीने खरेदी करतो. मात्र काहीवेळा सॉक्स धुताना किंवा वाळत टाकल्यावर कुठेवतरी हरवून जातात. त्यामुळे कपाटात फक्त एकाच पायाचे अनेक सॉक्स राहतात. यामुळे आपल्याला ऐनवेळी दोन्ही जोड्या असलेले सॉक्स शोधण्यास त्रास होतो. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करत असाल तर आधी कपाटात एकाच पायाचे उरलेले सॉक्स वेगळे बाजूला काढून घ्या.

एक्सपायरी डेट संपलेलं कॉस्मेटीक्स

मुलींना मेकअपची फार आवड असते. बाजारात ट्रेंडनुसार विविध पद्धतीचे आणि ब्रांडचे कॉस्मेटीक्स प्रोडक्ट येत असतात. त्यामुळे आपण सतत काही ना काही नवीन खरेदी करत असतो. नवीन वस्तू आणल्यावर जुने प्रोडक्ट आपण वापरत नाही. आता हे प्रोडक्ट असेच राहून काही दिवसांनी त्याची एक्सपायरी डेट संपून जाते. त्यामुळे अशावेळी तुम्ही चुकून असे प्रोडक्ट वापरल्यास त्याने त्वचा खराब होऊ शकते. असे काही घडण्याआधी तुम्ही स्वता एक्सपायरी डेट संपलेलं कॉस्मेटीक्स फेकून दिलं पाहिजे.

How to Clean Your Bedroom
Vastu Tips For Bedroom : झोपताना चुकूनही उशीखाली ठेवू नका या ५ गोष्टी, सतत भासेल पैशांची चणचण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com