Shoulder Injuries : उन्हाळ्यात खांद्याना होणारी दुखापत कशी टाळाल? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Shoulder Injuries Relief Tips : तुम्ही सध्या खांद्याच्या दुखण्याने ग्रासले असाल, तर तुमची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही खासी दिलेल्या काही टिप्स अवलंबू शकता
Shoulder Injuries
Shoulder InjuriesSaam tv

Shoulder Injuries Disease :

जसजसे तापमान वाढत जाते तसतसे पोहायला जाणे, गोल्फ खेळणे किंवा बीच व्हॉलीबॉल यांसारख्या मैदानी खेळांमध्ये गुंतण्याचा तुमचा कल वाढू शकतो. या शारीरीक क्रियांमुळे तुमच्या खांद्यावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे अतिवापरामुळे येणारी अस्वस्थता आणि दुखापत होऊ शकते. जर तुम्ही सध्या खांद्याच्या दुखण्याने ग्रासले असाल, तर तुमची लक्षणे (Symptoms) कमी करण्यासाठी तुम्ही खासी दिलेल्या काही टिप्स (Tips) अवलंबू शकता.

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलचे ऑर्थो-शोल्डर सर्जन, डॉ चिंतन देसाई म्हणतात, उन्हाळी सुट्टीत खांद्याशी संबंधित दुखापती होण्याची अधित शक्यता आहे कारण या हंगामात लोक विविध खेळ किंवा क्रियाकलापांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. जर तुमच्या खांद्याला दुखापत झाली असेल तर ती अधिक गंभीर समस्या बनण्यापासून रोखण्यासाठी त्वरित वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे. आपल्या उन्हाळी सुट्टीच्या आनंदावर बाधा आणू देऊ नका. उन्हाळ्यात (Summer Season) खांद्यासंबंध्या सामान्य दुखापती आणि उपचार

1. शोल्डर टिअर : यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये हालचाल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऊतींचे नुकसान होते. वारंवार येणाऱ्या तणावामुळे ही परिस्थिती विकसित होऊ शकते. शोल्डर टिअरची लक्षणांमध्ये तीव्र वेदना आणि प्रभावित भागाच्या हलचालींमध्ये येणारा अडथळा यांचा समावेश आहे.

Shoulder Injuries
Remedies for Gas and Acidity: उन्हाळ्यात अपचन- अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे घरगुती उपाय करुन पाहा, मिळेल आराम

2. खांद्यासंबंधी दुखापत : खांद्याच्या सांध्यांना आधार देणारे अस्थिबंधन ताणले किंवा फाटल्यास खांद्याला दुखापत होते. या प्रकारची दुखापत अनेकदा खांद्यावर थेट शारीरिक आघात झाल्यामुळे होते, जसे की शारीरिक हालचाली दरम्यान खांद्यावर पडणे, ताण येणे.

3. खांदा दुखणे: रोटेटर कफमध्ये चार स्नायूंचा संच असतो जो खांद्याच्या सांध्याची स्थिरता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. रोटेटर कफ टेंडन्स आणि बर्सामध्ये जळजळ झाल्यामुळे ड्रेसिंग किंवा हात वर करणे यासारख्या साध्या क्रियांमध्ये वेदना होऊ शकतात आणि त्यामुळे अगदी झोपेतही व्यत्यय येऊ शकतो. ही अस्वस्थता सामान्यत: खांद्यापासून कोपरापर्यंत जाणवू शकते.

Shoulder Injuries
Pregnancy Tips : गरोदरपणात मॉर्निंग सिकनेसमुळे वैतागले आहात? या गोष्टी लक्षात ठेवा

4. रोटेटर कफ टिअर: रोटेटर कफ हा चार स्नायूंचा एक भाग आहे जो खांद्याची स्थिरता राखण्याचे कार्य करतो. खांद्याच्या सर्व हालचालींमध्ये हे स्नायू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 'सुप्रास्पिनॅटस' , 'इन्फ्रास्पिनॅटस' , 'टेरेस मायनर' आणि 'सबकॅपुलॅरिस' अशा चार स्नायूंचा मिळून हा 'रोटेटर कफ' तयार होतो. खांदा स्थिर ठेवण्यासोबत सगळ्या हालचालींमध्ये हे चारही स्नायू एकत्र मिळून कार्य करतात.

5. टेंडोनिटिस आणि बर्साइटिस : यामुळे खांद्यावर जळजळ आणि वेदना होतात. टेंडोनिटिस टेंडिनोपॅथी विशेषतः टेंडन्सला लक्ष्य करते. बर्साइटिस हे स्नायुबंध आणि सांध्यांमधील द्रवाने भरलेल्या थैलीवर परिणाम करतो. ही परिस्थिती बिघडत गेल्याने खांद्यासंबंधी अस्वस्थता आणि हलचालींवर मर्यादा येऊ शकते.

खांद्याला होणारा आघात ही एक समस्या आहे जी जेव्हा खांद्यामधील स्नायुबंध आणि बर्सा हाडांवर त्याचा परिणाम होतो. वस्तू पोहोचणे, उचलणे आणि वाहून नेणे, तसेच डायनॅमिक ओव्हरहेड स्पोर्ट्समध्ये अडचणी येतात अशा क्रियांमध्ये वेदना होऊ शकते.खांद्याच्या दुखापतींचा सामना करण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्सचे अनुसरण करा.

Shoulder Injuries
After Facial Care Tips: फेशियल केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका; त्वचेला सतत सुटेल खाज, येतील रॅशेस

आपल्या खांद्याला बरे होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देणे महत्त्वाचे आहे. तुमच्या खांद्यावर वेदना किंवा ताण निर्माण करणाऱ्या क्रियाकलाप टाळा.

हॉट अॅण्ड कोल्ड थेरपी: जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा खांद्यावर बर्फ किंवा गरम पाण्याची पिशवीने शेकवायला विसरू नका.

फिजिओथेरपी: हे प्रभावित स्नायूंना लक्ष्य करते, आणि तुमच्या खांद्याच्या हालचाली सुरळीत करण्यास मदत करते. पुनर्वसन व्यायाम व्यतिरिक्त, खांद्याच्या दुखापतीने कारणीभूत असलेल्या कोणत्याही अंतर्निहित घटकांना संबोधित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये बसण्याची चुकीची पद्धत, स्नायूंमधील असंतुलन किंवा विशिष्ट स्नायूंचा अतिवापर यांचा समावेश असू शकतो. हे घटक ओळखून एखादी व्यक्ती दुखापतीचा धोका कमी करू शकते आणि खांद्याचे आरोग्य सुधारू शकतात.

वेदना कमी करण्यासाठी औषधे: फक्त डॉक्टरांनी सुचवलेली औषधे घ्या.

योग्य शारीरीक स्थिती राखा: तुमच्या खांद्यावर दबाव येऊ नये म्हणून पोहणे किंवा खेळासारख्या क्रियाकलापांमध्ये शरीराचे योग्य पोश्चर राखा. तुमच्या खांद्याला अतिरिक्त आधार देण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी ब्रेस किंवा स्लिंगचा वापर करा.

Shoulder Injuries
Diabetes Health : मधुमेहींनो, चुकूनही या ६ पदार्थांचे सेवन करु नका; रक्तातील साखर भरभर वाढेल

अनेकदा शस्त्रक्रिया करणे आवश्यक असू शकते हे समजून घेणे गरजेचे आहे. अशी काही प्रकरणे आहेत जिथे फाटलेले अस्थिबंधन किंवा स्नायुबंध दुरुस्त करण्यासाठी, निखळलेले सांधे स्थिर करण्यासाठी किंवा इतर संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाऊ शकते. ऑर्थोपेडिक तज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com