वेट लॉससाठी दिवसभरात किती चपात्या खाव्या? डिनरमध्ये चपातीसोबत खा 'हा' पदार्थ, कारण..

should we eat chapati at night for weight loss: वजन कमी करण्यासाठी चपाती खावी की नाही? आहारतज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला.
should we eat chapati at night for weight loss
should we eat chapati at night for weight lossSaam
Published On

भारतात चपाती शिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातही प्रामुख्याने आहारात चपातीचा समावेश असतो. लोकांना सकाळी आणि संध्याकाळी चपात्या खायला आवडतात. गव्हापासून तयार चपातीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, चपाती खाण्याचे प्रमाण कमी करा. आहारतज्ज्ञ स्वाती सिंह यांनी एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी चपाती खावी की नाही? याबाबत माहिती दिली. रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात? याबाबतही त्यांनी माहिती दिली.

एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात?

जे लोक फिटनेसकडे लक्ष देतात, अशी लोक डायटकडे बारकाईने लक्ष देतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारातून कॅलरीज कमी करण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा चपातीमध्ये किती कॅलरीज असतात हे ठाऊक नसते. याबद्दल लोक गोंधळलेले राहतात. बऱ्याचदा विविध धान्यांपासून तयार चपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण बदलत राहते.

should we eat chapati at night for weight loss
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

गव्हाच्या पिठापासून तयार चपातीमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. एका मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीमध्ये 104 कॅलरीज असतात. जर तुम्ही शंभर ग्राम गव्हाच्या पिठापासून तयार चपाती खात असाल तर शरीराला 340 कॅलरीज मिळतात. चपातीला तूप लावल्याने त्यातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. सर्वात कमी कॅलरीज ज्वारीच्या भाकरीमध्ये आढळतात. भाकरी मध्ये 40 कॅलरी असतात.

रात्री चपाती खावी की नाही?

बदललेला जीवनशैलीमुळे लोक दिवसभर उपाशी राहून रात्री जेवण करतात. किंवा फक्त दुपारी जेवण करतात. रात्री जास्त चपात्या खाल्ल्यानं वजन वाढू शकते. आहारतज्ज्ञ स्वाती सांगतात की, रात्रीच्या जेवणात दोनपेक्षा जास्त चपाती खाऊ नये. रात्री कमी चपात्या खा. आहारात डाळी, भाज्या सूप आणि चीजचा समावेश करा. महिलांनी रात्री दोनपेक्षा जास्त चपात्या खाऊ नये, तर पुरूषांनी रात्री तीन चपात्यांपेक्षा खाऊ नये.

should we eat chapati at night for weight loss
भारताचा शेजारचा देश हादरला; भूकंपाच्या धक्क्यामुळे सगळंच उद्ध्वस्त, ७ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्यात अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com