Fitness Tips: दररोज एक तास पायी चालल्यावर किती कॅलरीज बर्न होतात? वजन कमी करण्यासाठी चालणं खरंच फायदेशीर?

Fitness Tips: तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही दररोज केवळ एक तास जरी चाललात तरी तुमचं वजन नियंत्रणात येऊ शकतं. शिवाय यामुळे तुमचं कॅलरीज देखील बर्न होऊ शकतात.
Fitness Tips
Fitness Tipssaam tv
Published On

आजकाल आपल्या प्रत्येकाला फीट राहायचं आहे. फीट राहण्यासाठी आपण विविध पद्धतींचा वापर करतो. यामध्ये अनेकजण पायी चालण्यावर भर देतात. चालण्याने तुमचं वजन कमी होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही दररोज केवळ एक तास जरी चाललात तरी तुमचं वजन नियंत्रणात येऊ शकतं. शिवाय यामुळे तुमचं कॅलरीज देखील बर्न होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज एक तास वेगाने पायी चालल्यामुळे जवळपास तुमच्या २५- ते ३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण हे तुमच्या चालण्याच्या गतीवर अवलंबून असू शकतं. जर तुम्ही काहीसे हळू चालत असाल तर तुमचं कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण कमी असू शकतं.

Fitness Tips
Diwali Special weight loss Plan: दिवाळीच्या दिवसात गोडधोड खाणार असाल तर कसं ठेवाल वजन नियंत्रणात

चालण्याचे इतर फायदे

वजन कमी होण्यास होते मदत

नियमित चालल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं. यामध्ये तुम्ही एक तास नियमित चालण्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज तर कमी होऊ शकतता. यासोबतच पण चयापचय क्रियाही सुधारते.

तुमचं हृदय निरोगी राहतं

दररोज चालल्याने तुमचं हृदय मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते.

तुमचा मूड सुधारण्यास मदत होते

चालणं हा एक प्रकारचा कार्डिओ व्यायाम असून ज्यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात. हे मूड सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास फायदेशीर मानलं जातं.

मधुमेहाचा धोका करतं कमी

दररोज चालल्याने तुमचं ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे चालणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

पायी चालताना कोणती काळजी घ्याल?

दररोज 1 तास चालण्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु यावेळी चालताना काही खास काळजी घेणं गरजेचं आहे. यावेळी योग्य ते शूज निवडणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चालताना तुमची पाठ सरळ ठेवा आणि तुमचे हात हळूवारपणे पुढे आणि मागे फिरवत रहा. शक्य असल्यास सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारणं कधीही उत्तम

Fitness Tips
Brain Stroke: 'या' ब्लडग्रुपच्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त, पाहा तुमचा ब्लड ग्रुप यामध्ये आहे का?

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com