Brain Stroke: 'या' ब्लडग्रुपच्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त, पाहा तुमचा ब्लड ग्रुप यामध्ये आहे का?

Brain Stroke: तुम्ही कधी विचार केलाय की, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना स्ट्रोकचा धोका असतो. नव्या करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, हे समोर आलं आहे.
Blood Type and Brain Stroke
Brain Strokesaam tv
Published On

ब्रेन स्ट्रोक एक धोकादायक आणि जीवघेणी परिस्थिती मानली जाते. ब्रेन स्ट्रोक येणाऱ्या व्यक्तीला इतर अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय की, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला स्ट्रोकचा धोका असतो. नव्या करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, हे समोर आलं आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्याासनुसार, ज्या व्यक्तींना ब्लड ग्रुप A आहे, अशा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका असतो. ब्रेन स्ट्रोक हा साधारणपणे ६० वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो. परंतु ए ब्लडग्रुपच्या लोकांना स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो. संशोधनात आणखी कोणते खुलासे झालेत ते जाणून घेऊया.

Blood Type and Brain Stroke
Blocked Arteries: हृदयाच्या नसा बंद पडण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच तपासणी करून घ्या

काय आहे हा नेमका रिसर्च?

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केलंय. यामध्ये त्यांनी गेल्या 48 वर्षांच्या रेकॉर्डची तपासणी केली आहे. संशोधनात या जुने काही रेकॉर्ड्स तपासल्यानंतर असं आढळून आलं की, ए रक्तगटाच्या लोकांना लहान वयातच ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो.

तज्ज्ञांनी केलेल्या या संशोधनामध्ये सुमारे 6,00,000 लोकांमध्ये असाच प्रकार दिसून आला आहे. संशोधकांनी असंही निरीक्षण केलंय की, ए रक्तगट असलेल्या लोकांना इतर रक्तगटांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

A ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना अधिक धोका का?

आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की, A रक्तगट असलेल्या व्यक्तींना स्ट्रोकचा धोका का अधिक असतो? याचं कारण म्हणजे ए रक्तगट असलेलयांना अनुवांशिकतेमध्ये स्ट्रोकचा धोका असतो. हे पूर्णपणे अनुवांशिकतेवर आधारित आहे. इतर रक्तगटांच्या तुलनेत या रक्तगटाच्या लोकांना ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता 16% अधिक असते. इतर रक्तगट असलेल्या लोकांना अकाली स्ट्रोकचा धोका 12% असतो, तर O रक्तगट असलेल्या लोकांना, जो दुर्मिळ रक्त प्रकार आहे, त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वात कमी असल्याचं आढळून आलंय.

ब्रेन स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणं

  • तीव्र डोकेदुखी

  • चेहरा निस्तेज दिसतो

  • डोळ्यांची दृष्टी अंधुक होणं

  • ओठ फडफडणं

  • अन्न गिळण्यात अडचण येणं

Blood Type and Brain Stroke
Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरपूर्वी महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल; अजिबात दुर्लक्ष करू नका

ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे

  • रोज व्यायाम करा

  • सकस आहार घ्या

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

  • वजन नियंत्रणात ठेवा

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com