Hot food in fridge: अन्न शिजवल्यानंतर गरम असताना किती वेळाने फ्रीजमध्ये ठेवावं? ही आहे योग्य वेळ, नोट करून ठेवा

Food Danger Zone Temperature: गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवावे का? शिल्लक अन्न किती वेळ बाहेर ठेवावे? अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी जेवण थंड करण्याची योग्य पद्धत, फ्रिजचे तापमान आणि अन्न साठवताना घ्यायची महत्त्वाची काळजी जाणून घ्या.
Hot food in fridge
Hot food in fridgesaam tv
Published On: 

घरी जेवण बनवल्यानंतर ते खाणं आणि उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवणं ही अनेकांच्या घरातील रोजची सवय आहे. पण जेवण शिल्लक राहिल्यानंतर ते गरम असतानाच फ्रिजमध्ये ठेवता का? जर तुम्हीही असं करत असाल तर ही सवय बदलण्याची गरज आहे.

जेवणातून गरम वाफ येत असेल, ते खूप गरम असेल किंवा भांड्याला हात लावणंही कठीण जात असेल, तर असं जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. पण याचा अर्थ जेवण अनेक तास बाहेर ठेवावं, असाही होत नाही. जेवण कमी वेळात योग्य पद्धतीने थंड करून फ्रिजमध्ये ठेवणं गरजेचं आहे.

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते?

अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी ते जास्त वेळ अशा तापमानात राहणार नाही, याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. कारण काही ठराविक तापमानात अन्नामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात. या तापमानाला 'डेंजर झोन' म्हणजेच धोक्याची तापमान मर्यादा म्हणतात.

Hot food in fridge
Bathroom Door Design: बाथरूमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होतोय? classy look देणारे-टिकणारे हे 3 पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन

ही मर्यादा साधारण ४० ते १४० डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच ४ ते ६० डिग्री सेल्सिअस असतं. गरम जेवण थंड होत असताना या तापमानात असतं. मात्र या तापमानात जेवण जास्त वेळ राहिल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नातून विषबाधा किंवा पोटाचे त्रास होण्याचा धोका वाढू शकतो.

खोल भांड्यात जेवण ठेवल्यास काय अडचण येते?

जेवण शिजल्यानंतर ते त्याच मोठ्या आणि खोल भांड्यात भरून लगेच फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं. कारण अशा भांड्यात जेवणाचा आतील भाग बराच वेळ गरम राहू शकतो. त्यामुळे संपूर्ण जेवण लवकर थंड होत नाही. त्यामुळे जेवण जास्त वेळ धोक्याच्या तापमान मर्यादेत राहू शकते. याशिवाय खूप गरम भांडे थेट फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या इतर पदार्थांचं तापमानही वाढू शकतं. त्यामुळे फ्रिजला पुन्हा थंड होण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. याचा परिणाम फ्रिजच्या वीज वापरावरही होऊ शकतो.

गरम जेवण थंड करण्याची योग्य पद्धत कोणती?

जेवण थंड करण्यासाठी सर्वप्रथम ते ज्या भांड्यात शिजवलं आहे त्यातून बाहेर काढावं. त्यानंतर ते कमी खोली असलेल्या डब्यात ठेवावं. या डब्याची उंची साधारण चार इंचांपेक्षा जास्त नसावी. जेवण एका डब्यात खूप दाट भरून ठेवण्याऐवजी थोडं पसरवून ठेवावं. त्यामुळे त्यातील उष्णता लवकर बाहेर पडते आणि जेवण लवकर थंड होण्यास मदत होते.

जेवण अशा प्रकारे साधारण ३० ते ६० मिनिटे खोलीच्या तापमानात थंड होऊ द्यावं. जेवणाचा गरमपणा कमी झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवावे. फ्रिजचं तापमान ४० डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच साधारण ४ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असावं. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर जेवण आणखी थंड होत राहते.

Hot food in fridge
Kitchen Vastu Tips: घरात कोणत्या दिशेला पाण्याचा नळ असावा? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

जास्त जेवण शिल्लक राहिल्यास काय करावं?

कधी कधी घरात मोठ्या प्रमाणात जेवण बनवलं जातं आणि त्यातील बरेचसं जेवण शिल्लक राहतं. अशा वेळी सर्व जेवण एकाच मोठ्या आणि खोल डब्यात भरून ठेवू नये. त्याऐवजी जेवणाचे छोटे-छोटे भाग करून वेगवेगळ्या कमी खोलीच्या डब्यांमध्ये ठेवावं.

असं केल्यामुळे प्रत्येक डब्यातील जेवण लवकर थंड होते. तसंच जेवणातील उष्णता सर्व भागांतून सारख्या प्रमाणात बाहेर पडण्यास मदत होते. एका डब्यात खूप जास्त जेवण भरण्यापेक्षा ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये विभागून ठेवणं अधिक चांगलं आहे.

Hot food in fridge
Luxury Hotel Bed At Home: बेडवरची चादर सतत कोपऱ्यांमधून निघतेय? या 7 ट्रिक्स वापरा, एकही सुरकुती न पडता दिसेल अगदी हॉटेल रूमसारखा बेड

जेवण किती वेळ बाहेर ठेवणं सुरक्षित?

जेवण थंड करण्यासाठी ते खूप वेळ बाहेर ठेवणंही चुकीचं आहे. खोलीच्या तापमानात शिजवलेलं जेवण दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये. म्हणजेच जेवण बनवल्यानंतर ते अनेक तास बाहेर ठेवून रात्री फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. जेवण योग्य पद्धतीने आणि कमी वेळात थंड करून फ्रिजमध्ये ठेवणं हाच अन्न सुरक्षित ठेवण्याचा चांगला मार्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.