Spacewalks : स्पेसवॉक म्हणजे काय, कसं केलं जातं? अंतराळात पहिल्यांदा कोण चाललं होतं? वाचा सविस्तर

How Astronauts walk Float in space : अंतराळामध्ये स्पेसवॉक करणं अतिशय अवघड असतं. नेमकं स्पेसवॉक म्हणजे काय? यादरम्यान कोणत्या अडचणी येतात, हे आपण सविस्तर पाहु या.
अंतराळामध्ये स्पेसवॉक
SpacewalksSaam Tv
Published On

मुंबई : अंतराळवीरांसाठी सर्वात रोमांचक अनुभवांपैकी एक स्पेसवॉक मानला जातोय. सर्व तांत्रिक अडथळे पार करून अंतराळवीर अंतराळात पोहोचतात, तेव्हा मोकळ्या जागेत प्रवास करण्याची त्यांना इच्छा होते. आतापर्यंत केवळ सरकारी संस्थांचे अंतराळवीर स्पेसवॉक करायचे. परंतु पहिलं खाजगी स्पेसवॉक १२ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलंय. स्पेस एक्सच्या पोलारिस डॉन मिशनवर अंतराळात पोहोचलेले अब्जाधीश जेरेड इसाकमन यांनी स्पेसवॉक केलंय. त्यांच्यानंतर या मोहिमेत सामील झालेल्या सारा गिलीसने देखील स्पेसवॉक केलाय. या मोहिमेला आयझॅकमनने निधी दिला असल्याची माहिती मिळतेय. स्पेसवॉक नक्की काय असतं, ते कसं केलं जातं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या.

पोलारिस डॉनमध्ये अण्णा मेनन, सारा गिलिस, स्कॉट पोटेट आणि जेरेड इसाकमन यांच्यासह चार जणांचा क्रू आहे. इसाकमन आणि गिलिसचा स्पेसवॉक पृथ्वीवर थेट प्रक्षेपित करण्यात (How Astronauts walk Float in space) आला. इसाकमन आणि गिलिस व्हाईट ड्रॅगन कॅप्सूलमधून १५ मिनिटांच्या अंतराने बाहेर पडले. पृथ्वीच्या वर ७०० किमीवर तरंगताना दिसले. आयझॅकमन हे बाहेर आलेले पहिले होते. हातपाय, हात आणि पाय हलवून त्यांनी आपल्या सूटची चाचणी केली होता. मग तो हॅचच्या आत परतला.

स्पेसवॉक कसा करायचा?

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा अंतराळवीर अंतराळातील अंतराळयानातून बाहेर पडतो, तेव्हा त्याला स्पेसवॉक म्हणतात. जेव्हा अंतराळवीर स्पेसवॉकवर जातात तेव्हा सुरक्षिततेसाठी विशेष स्पेससूट घातले ( What is Spacewalks) जातात. स्पेससूटमध्ये श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन असतो. गरजेनुसार पाणी देखील असते. अंतराळवीर स्पेसवॉकसाठी निघण्यापूर्वी काही तास आधी स्पेससूट (How Astronauts walk) घालतात. हे सूट प्रेशराइज्ड असतात. सूट घातल्यानंतर अंतराळवीर काही तास शुद्ध ऑक्सिजनचा श्वास घेतात.

कारण ऑक्सिजन घेतल्याने अंतराळवीराच्या शरीरातील सर्व नायट्रोजन बाहेर पडतो. नायट्रोजन काढून टाकले नाही तर, अंतराळवीराच्या शरीरात स्पेसवॉक दरम्यान वायूचे फुगे तयार होण्याची शक्यता असते. पूर्णपणे तयार झाल्यानंतर अंतराळवीर 'एअरलॉक' उघडतात. या एअर लॉकला दोन दरवाजे असतात. जेव्हा अंतराळवीर अंतराळयानाच्या आत असतात, तेव्हा वायुरोधक हवाबंद असते. त्यामुळे कोणतीही हवा बाहेर पडू शकत नाही. स्पेसवॉक (Spacewalks) करत असताना अंतराळवीर सुरक्षा टिथरद्वारे अंतराळयानाशी कनेक्टेड राहतात.

अंतराळामध्ये स्पेसवॉक
Space Mission Health Effects: अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो? सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत नासाने दिली महत्वाची माहिती

अंतराळात प्रथम कोण चाललं?

अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती रशियाचा ॲलेक्सी लिओनोव्ह होते. त्यांनी १८ मार्च १९६५ रोजी पहिला स्पेसवॉक केला होता. हा स्पेसवॉक १० मिनिटांचा होता. त्याच वर्षी जूनमध्ये एड व्हाईट अंतराळामध्ये चालणारे ते पहिला अमेरिकन व्यक्ती बनले होते. व्हाईटने एकूण २३ मिनिटे स्पेसवॉक केला होता. आता अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबाहेर स्पेसवॉक करतात. हा स्पेसवॉक टास्कनुसार पाच ते आठ तास चालत असल्याची माहिती मिळतेय.

सर्वाधिक स्पेसवॉकसाठी कोणाचा रेकॉर्ड?

स्पेसवॉकची सर्वाधिक संख्या रशियन अंतराळवीर अनातोली सोलोव्हिएव्ह यांच्या नावावर आहे. त्यांनी १६ वेळा स्पेसवॉक केलाय. त्यांचा एकूण स्पेसवॉक अवकाशात ८२ तासांपेक्षा जास्त काळ चालला. नासाच्या चार अंतराळवीरांनी प्रत्येकी १० स्पेसवॉकही केले आहेत. मायकेल लोपेझ-अलेग्रिया, पेगी व्हिटसन, बॉब बेहनकेन आणि ख्रिस कॅसिडी अशी त्यांची नावे आहेत. या चौघांपैकी मायकेलने सर्वाधिक वेळ अवकाश स्थानकाच्या बाहेर घालवला. त्यांचा एकूण वेळ ६७ तासांपेक्षा अधिक आहे.

अंतराळामध्ये स्पेसवॉक
Nasa Space Programs : अंतराळ मोहिमांमध्ये किती जोखीम असते? अंतराळवीरांवर कोणते मानसिक, शारीरिक परिणाम होतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com