New Year बनवा आणखी खास; आपल्या प्रियकरासोबत मुंबईतील या रोमॅंटिक डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या

Honeymoon Destinations In Mumbai : सध्या न्यू इयरसुद्धा येणार आहे. त्यात तुम्ही प्रियकरासोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
Honeymoon Destinations In Mumbai
New Year Honeymoon Destinationsgoogle
Published On

प्रत्येक नात्यात वेळ देणं महत्वाचं असतं. तुम्ही तुमच्या प्रियकराला जितका वेळ देता तितकं तुमचं नातं जास्त घट्ट होतं आणि टिकतं. सध्या न्यू इयरसुद्धा येणार आहे. त्यात तुम्ही प्रियकरासोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. पण या गर्दीच्या ठिकाणी एक जागा निवडणं तुम्हाला अवघड जावू शकतं. म्हणून आम्ही तुमच्यासाठी रोमॅंटिक ठिकांनाची यादी आणली आहे. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तासनतास गप्पा मारू शकता.

मरिन ड्राइव्ह

मरिन ड्राइव्ह या प्रसिद्ध ठिकाणी अनेक जोडपी बसलेली तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही जोडीदाराबरोबर मोलाचा वेळ घालवू शकता. हे ठिकाण प्रत्येक जोडप्याच्या आवडीचं ठिकाण मानलं जातं. तिथे संध्याकाळी कपल्स एकत्र वेळ घालवतात. तर काही कपल्स दिवसभराच्या दगदगीतून तिथे शांत व्हायला येतात. तिथे बसल्यावर तुम्हाला वेळेचं भान उरत नाही. तिथे सुर्यास्त खूप छान पद्धतीनं, जवळून पाहता येतो.

Honeymoon Destinations In Mumbai
Winter Skin Care : किचनमधला 'हा' एक पदार्थ वापरा; हिवाळ्यातही मिळेल ग्लोइंग स्कीन

गेटवे ऑफ इंडिया

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत काही मजेशीर अॅक्टीविटी करत वेळ खालवणार असाल तर गेटवे ऑफ इंडिया हे डेस्टिनेशन उत्तम आहे. तिथे तुम्ही अनेक स्पॉटवर फोटो काढू शकता. तसेच समुद्रात बोट राइटचा आनंद सुद्धा घेवू शकता. इथे भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही कपल्स राइडसाठी येत असतात.

बॅंडस्टॅंड

वांद्रे मधील सगळ्यात प्रसिद्ध कपल्स स्पॉट म्हणजे बॅंडस्टॅंड. तिथे असणारा समुद्र, हैंगआउट स्पॉट, जॉगर्स पार्क हे पाहणासाठी कपल्स नियमित येत असतात. बॅंडस्टॅंड हे कपल्सच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. तिथे तुम्ही सगळ्यात उत्तम चाटचा अनुभव घेऊ शकता. तसेच तिथल्या पार्कमध्ये डोंगराळ भागाचा अनुभव घेऊ शकता.

रेनफॉरेस्ट रेस्टॉरंट

तुम्ही न्यू इयरला तुमच्या पार्टनरसोबत डेटला जाण्याचा प्लॅन करत असाल तर रेनफॉरेस्ट रेस्टॉरंट हा उत्तम पर्याय आहे. हे हॉटेल मुंबईच्या बेस्ट हॉटेलपैकी एक आहे. तिथे तुम्ही जंगलात असल्याचा आणि शांततेचा अनुभव तुमच्या प्रियकरासोबत घेऊ शकता. तिथल्या सजावटीने तुमचं लक्ष वेधलं जावू शकतं.

Honeymoon Destinations In Mumbai
Tiffin Box Recipes : तुमची मुलं भाज्या खात नाहीत? मग मुलांना टिफीनमध्ये द्या 'या' स्टाईलची क्रिस्पी भेंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com