असह्य टाचदुखीला असे करा बाय बाय !

अनेक वेळा चालताना अचानक टाच दुखायला सुरुवात होते आणि ती वेदना आपल्याला असह्य होते.
Heel pain, Massage For Heel Pain
Heel pain, Massage For Heel Painब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपण आपल्या शरीरातील अनेक वेदनांवर सहज उपाय करतो पण जर आपल्या टाचांचे दुखणे असले की, त्याची टाळाटाळ करतो. ही टाळाटाळ कितपत योग्य आहे ?

हे देखील पहा-

अनेक वेळा चालताना अचानक टाच दुखायला सुरुवात होते आणि ती वेदना आपल्याला असह्य होते. चालताना अचानक तळपायाच्या शिरा ताठ होऊन ते दुखू लागतात. हे कधीकधी अधिक चालल्यामुळे देखील होते या प्रकारच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. यात उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्त पुरवठ्यावर होणारा परिणाम किंवा वजन वाढणे इ. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लवकर आराम मिळवायचा असेल तर मसाज हा रामबाण उपायापेक्षा कमी नाही.

आराम कसा मिळवाल

सर्व प्रकारच्या शरीरदुखणीसाठी मसाज केला जातो. हा उपाय आपण टाचदुखीसाठी देखील करु शकतो, ज्यामुळे आपल्या वेदना नक्कीच कमी होतील.

१. पायाच्या तळव्यावर दोन्ही हातांच्या अंगठ्याने पायाच्या बोटापासून टाचांपर्यंत जोरदार दाब देत रहा त्यामुळे आपल्याला आराम मिळेल.

२. हाताची मुठ करुन टाचांचा मसाज करावा त्यामुळे, वेदना लवकर बऱ्या होतील.

Heel pain, Massage For Heel Pain
World Menstrual Hygiene Day : मासिक पाळी दरम्यान शरीराची स्वच्छता का राखावी ?

या गोष्टींची काळजी घ्या

- या मसाजामुळे टाचांच्या दुखण्यापासून काही काळ आराम मिळेल.

- मसाज करताना आपण अशाप्रकारे बसायला हवे ज्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपली बोटे घोट्यापर्यंत सहज पोहोचू शकतील.

- आपण मसाजसाठी कोणतेही थंड (Cold) आणि प्रभावी तेलाचाही (Oil) वापर करु शकतो ज्यामुळे पायांना आराम मिळेल.

- लक्षात ठेवा मसाज हा जास्तीत जास्त १० मिनिटे करायला हवा. अधिक वेळ मसाज केल्यास त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.

- तसेच पायाच्या मसाजसाठी आपण टेनिस किंवा क्रिकेट बॉल वापर करु शकतो. सोफा, खुर्ची किंवा पलंगावर बसून बॉलवर पाय ठेवा आणि पाय गोल फिरवा काही वेळात आराम वाटेल.

- कधीकधी एखाद्या विशिष्ट ठिकाणी दुखणे (Pain) थोडे जास्त असते, त्या ठिकाणी जास्त दाब देणे टाळा नाहीतर दुखणे अधिक वाढेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com