मुंबई : पूर्वीच्या काळी स्त्रियांना मासिक पाळी आली की, कावळा शिवला, पाटावर बसली किंवा एका विशिष्ट ठरवून दिलेल्या खोलीत तिला राहावे लागत असे परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार सध्या मासिक पाळीबद्दल सहजरित्या चर्चा होते.
हे देखील पहा-
'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' हा दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो. मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा या मागचा मुख्य उद्देश. खेड्यापाड्यात आणि शहरांमधील काही भागात राहणाऱ्या लाखो महिलांना आजही यासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या बाबी माहित नाही आणि त्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे त्यांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. (World Menstrual Hygiene Day 2022)
या दिनाचे महत्त्व-
'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' साजरा करण्यामागचा उद्देश तरुण मुलींनी आणि महिलांनी मासिक पाळीच्या काळात शरीराच्या स्वच्छतेची काळजी (Care) कशी घ्यावी व त्यावर योग्य ती चर्चा करुन स्वत:चे आयुष्य सुरक्षित कसे ठेवता येईल याविषयी त्यांच्यात जागरुकता कशी निर्माण करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.
या दिवसाबद्दल -
२८ मे २०१४ मध्ये वॉश युनायटेड ऑफ जर्मनी या एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिवस पहिल्यांदा साजरा केला. महिलांचे (Womens) मासिक पाळीचे चक्राचा कालावधी हा २८ दिवसांचा असतो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी २८ तारीख निवडण्यात आली.
स्वच्छतेची काळजी -
आजही जगभरात (World) अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या याविषयावर सहजपणे बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या त्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या कशामुळे उद्भवू शकते, स्वच्छतेच्या मदतीने कोणते आजार टाळता येतात आदीची माहिती त्यांना मिळत नाही. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेवर अधिक भर द्यायला हवा. याकाळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनचा धोका आहे. तसेच अनेक महिलांच्या इनफर्टिलिटी संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, योनीमार्गाचा संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांकडे ढकलू शकते हेही त्यांना माहीत नाही.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.