

Home Remedy For Sugar Control : सध्या डायबिटिजचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जर तुम्हाला शुगर लेवल मेंटेन करायची असेल तर औषधांसोबतच घरगुती उपायदेखील करायला हवे. घरगुती उपाय करुन डायबिटिजवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. डायबिटिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी या 4 औषधी वनस्पतीं उपयोगी ठरतील.
आहारातील बदल, योगा व खाण्यापिण्यावर नियंत्रणात ठेवल्यास आपण या आजारावर (Disease) आपल्याला मात करता येऊ शकते.
बडिशेपच्या वनस्पतीच्या पाने रोज खाणे ब्लड शुगरसाठी फायद्याचे (Benefits) असते. हे वृक्ष तुम्ही तुमच्या घरातही लावू शकतात.
हेल्थ एक्सपर्टनुसार, इन्सुलिन वनस्पतीच्या पानांना रोज चावल्याने शुगरवर कंट्रोल ठेवू शकतो.
इन्सुलिन वनस्पतीचे पान -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इन्सुलिन वनस्पतीचे पान एक महिना रोज चघळल्याने शुगरमध्ये आराम मिळतो. तुम्ही पावडरच्या स्वरूपातही त्याचे सेवन करू शकता. या पानांची फक्त कोरडी पाने बारीक करून पावडर बनवायची आहे.
यामुळे मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहतो. त्यात प्रोटीन, टेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक अॅसिड, लोह, बी कॅरोटीन, कोरोसोलिक अॅसिड यासह अनेक पोषक घटक आढळतात, जे शुगरवर रामबाण उपाय ठरतात.
तुळशीची पाने -
ताप, हृदयाशी संबंधित आजार, पोटदुखी, मलेरिया आणि बॅक्टेरिया इत्यादींवर तुळशीची पाने खूप फायदेशीर आहेत. तुळशीच्या औषधी गुणांमध्ये श्याम तुळशी हे रामा तुळशीपेक्षा जास्त फायदेशीर आहे.
कडुलिंबाची पानं -
कडुलिंबाच्या पानांमुळे तुमची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील. कडुलिंबाची पानं रोज सकाळी चघळाने फायदे होतील. फक्त त्याची पानेच नाही तर त्याची साल आणि देठ देखील खूप फायदेशीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.