
किडनीच्या कार्यक्षमतेचे तपासणं महत्त्वाचं आहे.
लघवीचं प्रमाण हे किडनी स्वस्थतेचं सूचक आहे.
युरिन आउटपुटचा वापर गंभीर परिस्थितींतही होतो.
आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी...अनेकदा काही कारणामुळे आपली किडनी योग्यरित्या काम करत नाही. किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे तपासण्यासाठी अनेक जण आरएफटी (Renal Function Test) किंवा इतर चाचण्या करतात. मात्र युरोलॉजिस्ट डॉ. परवेज यांच्या मते, एक अगदी सोपी पद्धत आहे जी आपण घरबसल्या स्वतः करून पाहू शकतो आणि त्यावरून किडनीचं कार्य व्यवस्थित सुरु आहे का नाही याची माहिती घेऊ शकतो.
डॉ. परवेज यांनी २९ एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलंय की, कोणत्याही महागड्या चाचण्या न करता दोन्ही किडनी व्यवस्थित आहेत का हे ‘युरिन आउटपुट’ म्हणजेच लघवी निर्मितीवरून सहज ओळखता येते.
डॉ. परवेज यांच्या मते, आपल्या किडनींची तब्येत तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लघवीच्या निर्मितीचे प्रमाण पाहणे. त्यांनी सांगितलं की, “सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचं युरिन आउटपुट हे ०.५ ते १ मिली प्रति किलो प्रति तास इतकं असतं.”
याचा अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीचे वजन ५० किलो असेल, तर त्या व्यक्तीचे प्रति तास सुमारे २५ ते ५० मिली लघवी निर्मिती होणं अपेक्षित आहे. म्हणजे ५० किलो वजन असलेल्या व्यक्तीचा १ तासाचा सरासरी युरिन आउटपुट ५० मिली असणार आहे. तर त्याच्या किडनी व्यवस्थित काम करत आहेत असं समजावं.
तर आता प्रश्न असा येतो की, आपल्याच घरी बसून लघवी निर्मितीची पद्धत कशी तपासून पाहावी?यासाठी डॉ. परवेज यांनी सांगितले की, कमीत कमी १० तासांचं मूत्र एकत्र करून त्याचं मोजमाप करा. उदाहरणार्थ, ५० किलो वजन असलेल्या व्यक्तीने १० तासांत साधारण ५०० मिली मूत्र तयार केलं पाहिजे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “तुम्ही साधी एक लिटरची पाण्याची बाटली वापरून मोजू शकता. जर तुमचं मूत्रनिर्मितीचे प्रमाण योग्य असेल, तर याचा अर्थ तुमच्या किडनी व्यवस्थित आहेत. ही अतिशय सोपी चाचणी आहे जी महागड्या टेस्टशिवाय तुम्हाला किडनीच्या आरोग्याची कल्पना देते.”
डॉ. परवेज पुढे म्हणाले, “युरिन आउटपुट हा किडनी फंक्शन तपासण्यासाठी पुरेसा असतो. मोठ्या रुग्णालयांत किंवा गंभीर परिस्थितीत, जसं सेप्सिस, शॉक किंवा रुग्ण आयसीयूमध्ये असताना डॉक्टर सर्वप्रथम लघवी निर्मिती तपासतात. त्यावरूनच किडनी किती चांगल्या प्रकारे काम करत आहेत याचा अंदाज घेतला जातो.”
किडनीच्या कार्यक्षमतेचे तपासणे का आवश्यक आहे?
जर किडनी योग्यरित्या काम करत नसेल, तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊन गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.
घरी बसून किडनीची कार्यक्षमता कशी तपासावी?
घरी बसून किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी कमीत कमी १० तासांत तयार होणारे मूत्र एकत्र करून त्याचे मोजमाप करावे.
युरिन आउटपुटच्या आधारे किडनीची स्थिती कशी ओळखावी?
सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे युरिन आउटपुट ०.५ ते १ मिली प्रति किलो प्रति तास इतके असते.
युरिन आउटपुटचा वापर गंभीर आरोग्य परिस्थितींत कसा होतो?
गंभीर परिस्थितींत, जसे की सेप्सिस किंवा शॉक, डॉक्टरांनी सर्वप्रथम रुग्णाचे युरिन आउटपुट तपासतात.
रुग्णालयात किडनीची तपासणी कशी केली जाते?
रुग्णालयात गंभीर परिस्थितीत डॉक्टर प्रथम लघवीचे प्रमाण तपासतात, कारण त्यावरून किडनीच्या कार्यक्षमतेचा वेगवान अंदाज येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.