High cholesterol: तुम्ही फिट असूनही वाढतंय कोलेस्ट्रॉल? या 4 दररोजच्या सवयींमुळे मोठा धोका

Heart attack risk: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीचा आहार, ताण, धूम्रपान आणि इतर सवयींमुळे LDL वाढतं. यामागील कारणे आणि आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक उपाय जाणून घ्या.
high cholesterol
cholesterol symptomsgoogle
Published On

सध्याच्या आयुष्यात हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ प्रौढ व्यक्तीच नाही, तर आता तरुणांमध्येही याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅक कधीही अचानक येत नाही. तो येण्यामागे तुमच्या दररोजच्या सवयी, आहार आणि शारीरिक इतर कारणांमुळे हा धोका वाढत जातो. उच्च कोलेस्ट्रॉल ज्याला हायपरलिपिडेमिया असंही म्हटलं जातं, यामागे मुख्यतः चुकीचा आहार आणि जीवनशैली कारणीभूत असतात.

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सयुक्त अन्न खाल्ल्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढतं. त्यासोबतच व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा हेही मोठे धोके मानले जातात. तज्ज्ञांनी इतर कोणत्या कारणांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं याबाबत माहिती दिली आहे.

कॉफी

आपल्यापैकी अनेकांना कॉफी खूप आवडते. तुम्हीही कॉफी पित असाल, तर त्याचा अतिरेक करू नका. समोर आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती दिवसाला चार कप कॉफी पित होत्या, त्यांच्यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे जरी तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल, तरीही ती मर्यादित प्रमाणातच प्यावी.

high cholesterol
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

स्ट्रेस

आजकालच्या जगात स्ट्रेस हा जवळपास प्रत्येक व्यक्तीला आहे. सततच्या मानसिक ताणाने तुमच्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळे तुम्ही दररोज व्यायाम करून ताणतणाव नियंत्रणात ठेवू शकता.

high cholesterol
Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धुम्रपान

सिगारेट ही तुमच्या आरोग्यासाठी वाईटच मानली जाते. सिगारेटमधील निकोटिनमुळे शरीरातील चांगलं HDL कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागतं. हे HDL वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं. त्यामुळे धूम्रपान पूर्णपणे टाळणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

high cholesterol
How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

प्रेग्नेंसी

गर्भावस्थेदरम्यान महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी ३० ते ४० टक्क्यांनी वाढणं हे नैसर्गिक मानलं जातं, कारण गर्भाच्या वाढीसाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं. या काळात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन आणि इन्सुलिन रेसिस्टन्स यांसारख्या घटकांमुळे ही वाढ होते. मात्र, काही प्रकरणांमध्ये कोलेस्ट्रॉल खूपच वाढल्यास ‘मॅटर्नल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com