High Cholesterol: नाश्त्यातील 'हे' ५ आवडीचे पदार्थ वाढवतात कोलेस्टेरॉल; हृदय निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

Heart Health : सकाळच्या नाश्त्यातील काही सामान्य पदार्थ खराब कोलेस्टेरॉल वाढवू शकतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या या ५ पदार्थांपासून सावध राहा आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची निवड करा.
LDL cholesterol
LDL cholesterolchatgpt
Published On

सध्याचा बदलत्या लाइफस्टाइलमुळे तरुणांना कमी वयातच काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्याला त्यांच्या दैनंदिन सवयी कारणीभूत असतात. यामध्ये आहार हा महत्त्वाचा मुद्दा असतो. घाईगडबीत किंवा कामाच्या दगदगीत आपण चुकीच्या वेळी आणि मिळेल ते पदार्थ खातो. पण त्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. मुळात तुम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच चुकीचे पदार्थ खाल्लेत री तुमच्या रक्तातलं खराब कोलेस्टेरॉल (LDL) वाढायला सुरुवात होते. त्याने भविष्यात हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, साखरेचं प्रमाण जास्त असलेली ब्रेकफास्ट सीरिअल्स आरोग्यासाठी फारशी चांगली नसतात. त्यामध्ये प्रोस्डेट केलेले कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचं प्रमाण कमी असल्यामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी ओट्स किंवा साखर नसलेले संपूर्ण धान्याचे पदार्थ खाणं जास्त फायदेशीर ठरेल.

LDL cholesterol
NHAI Toll Rules: खुशखबर! टोल टॅक्समध्ये 40% पर्यंत मोठी सूट! NHAI चा नवा नियम लागू

तसेच पुऱ्या, समोसे आणि इतर तळलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात रोज खाल्ल्यावर शरीरात फॅटचं प्रमाण वाढतं. या पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साचायचा धोका वाढतो, त्याचा परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होतो.

LDL cholesterol
IDA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महागाई भत्ता वाढला, जाणून घ्या किती वाढणार पगार

कुकीज, डोनट्स आणि इतर बेकरीतले गोड पदार्थसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढायला मदत होते.

त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन शक्यतो मर्यादित ठेवा. तर दूध, दही आणि चीज हे आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी त्याने सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे लो-फॅट किंवा फॅट -फ्री दुग्धजन्य पदार्थांची निवड करणं जास्त योग्य ठरतं. यासवयी फॉलो केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हेल्दी लाइफस्टाइल जगता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com