Blood Pressure Check: BP रोज तपासा, डॉक्टरांनी दिला सल्ला अन् घरच्याघरी तपासण्याच्या टिप्स

High BP: घरच्या घरी नियमित रक्तदाब तपासल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनी आजारांचा धोका कमी होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या सुरक्षित टिप्स जाणून घ्या.
high blood pressure
Blood Pressure Check Google
Published On

सध्या कोणतही काम करायचं असेल तर लोक जास्त मेहनत न घेता ते काम सोपं करण्याकडे भर देतात. जसं की, स्वयंपाकघरातल्या अनेक वस्तू. त्यामध्ये पाटा वरवंटा न वापरता मिक्सर वापरतात. ही एक फास्ट आणि सोपी पद्धत झालीये. कारण सध्या विज्ञान तंत्रज्ञान खूप विकसित झालंय. याचाच फायदा तुम्ही एखादा आजार तपासण्यासाठी घेऊ शकता.

जसं की तुम्हाला वजन तपासायचे असेल तर तुम्ही ती मशिनचं खरी आणता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर बीपीच्या त्रास असेल तर तुम्ही ती मशीनही घरी आणू शकता. याने तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होऊ शकते. याबद्दल अनेक मनात शंका असतील तर पुढील बातमी नक्की वाचा.

हाय ब्लड प्रेशर ही आजकाल सगळ्यांमध्येच आढळणारी समस्या आहे. हार्ट अटॅक, स्ट्रोक, हृदय निकामी होणे, किडनीचे आजार आणि अगदी डिमेन्शियासारख्या गंभीर आजारांचे हे एक प्रमुख कारण असतं. त्यामुळेच डॉक्टर नेहमी आपले बीपीचे आकडे तपासत राहा असा सल्ला देतात.

high blood pressure
Skin Care Tips: वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मेकअप रिमूव्हल करताना ही 1 चूक टाळा

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार 120/80 mmHg हे नॉर्मल रक्तदाबाचं प्रमाण मानलं जातं. मात्र, जवळपास निम्म्या प्रौढांमध्ये यापेक्षा जास्त रक्तदाब असतो आणि अनेकांना त्याची जाणीवही नसते. त्यामुळे घरच्या घरी नियमित बीपी तपासणे हा बेस्ट पर्याय आहे.

घरच्या घरी रक्तदाब तपासणं हे सोपं, सुरक्षित आहे. कारण काही रुग्णांना डॉक्टरांकडे गेल्यावर जास्त भीती, तणाव जाणवतो, त्याने रक्तदाब तात्पुरता वाढतो. यालाच व्हाइट कोट इफेक्ट म्हणतात. म्हणून घरच्या घरी दोनदा शांत बसून रक्तदाब तपासावा. यासाठी बाजारात मिळणारी डॉक्टरांच्या सल्ल्याने बीपीची मशीन घ्या. मशीन विकत घेतल्यानंतर ती डॉक्टरांकडे घेऊन जा. त्यांच्याकडे असणाऱ्या मशीनशी तुलना करून पाहा याने तुम्हाला याचा एक अंदाज येईल. जर तुम्हाला 180/120 mmHg येवढा रक्तदाब असेल तर त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या.

टीप: हा लेख केवळ माहिती देण्यासाठी असून तो वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणत्याही आजाराबाबत शंका असल्यास किंवा उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

high blood pressure
Heart Blockage: जास्त धावपळीमुळे वाढेल हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी सांगितली ही ४ लक्षणं, वाचून व्हाल चकीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com