Hero Glamour Features : हिरो मोटोकॉपने बाजारात पुन्हा एकदा आपली नवीन ग्लॅमर लॉन्च केले आहे. ग्लॅमरच्या सुधारित लुक कंपनीमध्ये 125cc विभागातील तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आली आहे.
कंपनीने Hero Glamour चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. याचे स्टायलिश डिझाइन अनेक ब्रॅण्डला टक्कर देणार आहे असे कंपनीचे मत आहे. जाणून घेऊया फीचर्स व किंमत
याचे डिझाइन नवीव ग्लॅमर अधिक शक्तिशाली व लक्षवेधक आहे. नवीन चेकर्ड स्ट्राइप्स क्लासिक स्टायलिंग अस्पायरेशन्समध्ये अधिक आकर्षकतेची भर करतात. उच्च दर्जाच्या एर्गोनॉमिक्समधून लांबच्या प्रवासादरम्यान (Travel) उच्च दर्जाचा आरामदायीपणा व अॅक्सेसेबिलिटीची खात्री मिळते.
दोन व्हेरिएण्ट्स ड्रम व डिस्कमध्ये लाँच करण्यात आलेली नवीन ग्लॅमर देशभरातील हिरो मोटोकॉर्प शोरूम्समध्ये ८२,३४८ रूपये (ड्रम व्हेरिएण्ट)* आणि ८६,३४८ रूपये (डिस्क व्हेरिएण्ट)* या किंमतीत उपलब्ध आहे.
या लाँचबाबत आपले मत व्यक्त करत हिरो मोटोकार्पच्या इंडिया बीयूमधील चीफ बिझनेस ऑफिसर श्री. रणजीवजीत सिंग म्हणाले, अधिक लोकप्रियतेसह ग्लॅमरचे देशभरातील तरूणांमध्ये चाहते आहेत, जे स्टाइल, आरामदायीपणा व तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत. हिरो मोटोकॉर्प ग्राहकांना नेहमी विशिष्ट वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादने प्रदान करण्याचा मनसुबा आहे. लाँच करण्यात आलेली नवीन ग्लॅमर सर्वात स्पर्धात्मक १२५ सीसी विभागामध्ये ब्रॅण्डची उपस्थिती अधिक प्रबळ करेल आणि बाजारपेठ हिस्स्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करेल. प्रतिष्ठित ग्लॅमर आपल्या नवीन अवतारासह आमच्या दुचाकी पोर्टफोलिओच्या वाढत्या अपीलमध्ये अधिक भर करेल.
1. स्टाइल
नवीन ग्लॅमरची डिझाइन आणि महागड्या सरफेसेसमधून वेईकलची भव्यता दिसून येते. आकार, विशिष्ट प्रमाण क्लासिक डिझाइन घटकांशी सुरेखपणे सामावून जातात. आपल्या डीएनएला अधिक पुढे घेऊन जात ग्लॅमरमधील शक्तिशाली वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत, जसे फ्रण्ट काऊल, फ्यूएल टँक आणि श्रॉडचे फॉर्म. चेकर्ड स्ट्राइप्स ग्लॅमरच्या लुकमध्ये अधिक भर घालतात.
2. आरामदायीपणा
राइडर (८ मिमी) व पिलियन सीट हाइट (१७ मिमी)च्या माध्यमातून उच्च दर्जाचे एर्गोनॉमिक्स सुलभ अॅक्सेसेबिलिटी आणि अपसाइट सीटिंग पोझिशनची खात्री देतात. फ्लॅटर टँक प्रोफाइल आणि सुधारित राइडर सीट स्पेस सक्रिय व उच्च दर्जाचा आरामदायीपणा देतात. १७० मिमीचा ग्राऊंड क्लीअरन्स आत्मविश्वासपूर्ण राइडिंग स्टान्स देते.
3. तंत्रज्ञान-सक्षम
नवीन ग्लॅमरमध्ये फुल डिजिटल क्लस्टर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, लो फ्यूएल इंडिकेटर आहे, ज्यामधून सुलभ व विनासायास राइडिंग अनुभवाची खात्री मिळते. तसेच या वेईकलमध्ये इंटीग्रेटेड यूएसबी चार्जर देखील आहे, जो राइडर्सच्या सोयीसुविधेमध्ये अधिक वाढ करतो.
4. इंजिन
या मोटरसायकलमध्ये ओबीडी२ व ई२० प्रमाणित १२५ सीसी इंजिन आहे, जे ७५०० आरपीएममध्ये ७.९४ केडब्ल्यूचे पॉवर आऊटपुट आणि ६००० आरपीएममध्ये १०.६ एनएम टॉर्क देते. ही मोटरसायकल प्रतिलिटर ६३ किमीचे मायलेज देते. हिरो मोटोकॉर्पच्या क्रांतिकारी आय३एस (इडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) सह मोटरसायकल ब्रॅण्डचे कार्यक्षमता, आरामदायीपणा व मायलेज देते.
5. कलर स्किम्स
नवीन ग्लॅमर तीन आकर्षक नवीन रंगांमध्ये येते, जे कुशलपणे मोटरसायकलच्या विविध विशिष्टतांना दाखवतात. कँडी ब्लेझिंग रेड, टेक्नो ब्ल्यू-ब्लॅक आणि स्पोर्टस् हे रंग आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.