Heart Disease Symptoms: शरीरात एकाच वेळी ही ७ लक्षणे; हार्ट फेल होण्याचे असू शकतात संकेत, वेळीच व्हा सावध

Heart Attack Symptoms: हृदयविकाराची लक्षणे वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे. श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, थकवा, सूज, अनियमित धडधड ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.
Heart Disease Symptoms
Heart Attack SymptomsGoogle
Published On

आजच्या धावपळीच्या आणि तणावातल्या जीवनशैलीत झपाट्याने हार्ट डिसीज म्हणजेच हृदयविकार होण्याची वाढताना दिसत आहे. बाहेरचे खाणे, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, व्यायाम न करणे आणि वाढणारा ताण हे सगळे घटक हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. अनेकदा लोक हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्योरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि याच निष्काळजीपणामुळे मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील काही संकेत ओळखणे आणि वेळेवर तपासणी करून घेणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

हार्ट फेल होण्याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. जर तुम्हाला अगदी हलकं काम करतानाही दम लागतोय किंवा श्वास फुलतोय असे जाणवत असेल, तर हे हृदय कमकुवत होण्याचे लक्षण असू शकते. त्यानंतर पाय दुखणे, टाचा सुजणे ही देखील गंभीर बाब आहे. हृदय नीट रक्तप्रवाह न करू शकल्यामुळे शरीरात पाणी साचते आणि ही सूज दिसते.

Heart Disease Symptoms
Mosquito Bite Remedy : डास चावल्यानंतर लगेच काय करावे?

छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे हीदेखील एक गंभीर चेतावणी आहे. बर्‍याचदा लोक याकडे गॅस, अॅसिडिटी किंवा अपचन म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार होणारा छातीतला त्रास हे हार्ट फेल्योरचे लक्षणे असू शकते. याशिवाय सतत थकवा जाणवणे, अंगात कमजोरी राहणे, काम करण्याची ऊर्जा कमी होणे हेही हृदयाच्या कमकुवत होण्याचे संकेत आहेत.

धडधड वाढणे हे आणखी एक मोठं लक्षण आहे. कधी अचानक खूप वेगाने छातीत धडधड होतं, कधी थांबून पुन्हा सुरू होतं हे सर्व हार्ट फेल्योरचे संकेत आहेत. तसेच, वारंवार खोकला होणे किंवा बलगम जमणे हे फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्याचे लक्षण असून, ते हृदयाच्या कमजोरीशी थेट संबंधित आहे. याशिवाय, रात्री वारंवार लघवीला जाण्याची वेळ येणे हीदेखील हृदयाच्या आजाराची महत्त्वाची खूण आहे.

Heart Disease Symptoms
Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com