Sakshi Sunil Jadhav
पितृपक्षाच्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील पूजाघर व जागा स्वच्छ करावी.
पितरांच्या आठवणीने मन शांत ठेवून विधी सुरू करावा. त्यांच्या फोटोजवळ किंवा पिंडासाठी जागा ठरवून घ्यावी.
कुशाचे आसन घालून बसावे. समोर दिवा लावावा.
तांदूळ, काळे तीळ मिसळून पाण्यात टाकून तर्पण करावे. हे दक्षिणेकडे तोंड करून पितरांना अर्पण करावे.
तांदळाचे गोळे (पिंड) तयार करून पितरांना अर्पण करावे. नंतर हे पिंड पक्ष्यांना, गायीला किंवा पाण्यात सोडावे.
‘ॐ पितृभ्यः स्वधा’ हा मंत्र म्हणावा. शक्य असल्यास पंडितांच्या मार्गदर्शनाने मंत्र पठण करावे.
खीर, पुरणपोळी, वरणभात, तूप, फळं अशा पदार्थांचा नैवेद्य ठेवावा.