Sakshi Sunil Jadhav
यंदाच्या वर्षी गरब्याला येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात होणार आहे. गरबा खेळायला जाताना मुलींना खूप घाम येतो आणि त्यांचा मेकअप बिघडतो. यासाठी पुढील माहिती वाचा.
सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर व प्रायमर लावा. त्याने मेकअप जास्त वेळ टिकतो.
आपल्या स्किनटोनशी जुळणारं लाइटवेट फाउंडेशन लावा, जे नॅचरल लूक देईल.
शिमरी आयशॅडो, काजळ आणि विंग्ड आयलाइनरने डोळ्यांना बोल्ड लूक द्या. त्याने तुम्ही आकर्षक दिसाल.
गुलाबी किंवा पीच टोन ब्लश वापरल्याने चेहऱ्यावर फ्रेशनेस येतो.
ब्राइट रेड, पिंक किंवा वाईन शेड लिपस्टिक निवडा जी पोशाखाशी जुळेल.
मेकअप लॉक करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरा, त्यामुळे तो जास्त वेळ टिकेल.