

सध्याच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या ह्रदयावर होतो. चुकीचा आहार आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेकांना हार्ट ब्लॉकेजच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. जर तुम्ही यावर वेळेवर उपचार नाही केलेत तर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअरसारख्या जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागतं.
हार्ट ब्लॉकेज म्हणजे ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅट, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ साचणं. यामुळे रक्तवाहिन्या जास्त फुगतात किंवा अरुंद होतात आणि हार्टपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. वैद्यकीय भाषेत याला कोरोनरी आर्टरी असंही म्हणतात. Who या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ह्रदयविकार हा जगातल्या मृत्यूचं प्रमुख कारण मानला जात आहे. त्यामुळे तुम्ही पुढील सामान्य वाटणाऱ्यां लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
1. छातीत सतत दुखणं.
जर सतत तुमच्या छातीत दुखत असेल तर जडपणा येतो आणि दुखायला लागतं. हे हार्ट ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. यामध्ये चालताना किंवा जिने चढताना याचा त्रास वाढत जातो.
2. श्वास घेताना अचानक त्रास जाणवेणे.
आपल्याला जास्त चालल्यावर किंवा उड्या मारल्यावर श्वास घ्यायला थोडा वेळ त्रास होतो. पण थोडं चालल्यावर किंवा बोलताना धापा लागत असतील तर तुमचं हृदय नीट काम करत नसल्याचं लक्षण असू शकतं. हृदयाला पुरेसं ऑक्सिजन रक्तपुरवठा होत नसेल तर हा त्रास जाणवतो.
3. दिवसभर थकवा येणे.
पुरेशी झोप झाली असेल पण तरीही शरीर थकल्यासारखं वाटत असेल आणि ही समस्या खूप दिवस जाणवत असेल तर ते सामान्य लक्षण नाही. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे शरीराला एनर्जी मिळत नाही आणि त्यामुळे सतत अशक्तपणा जाणवू शकतो.
4. थंड वातावरणात सुद्धा जास्त घाम येणे.
उन्हाळ्यात सगळ्यांनाच घाम येतो. पण अचानक झोपेत किंवा काही न करता अचानक घाम फुटत असेल तर हे सामान्य लक्षण नाही. छातीत दुखणं आणि घाम येणं एकत्र होत असेल तर ते हार्ट अटॅकचंही लक्षण असू शकतं.
5. जेवण न पचणे.
बऱ्याचदा मळमळ, उलट्या किंवा अपचनाचा त्रास हा पोटाशी संबंधित वाटतो. पण काही वेळेस हे हृदयाशी संबंधित गंभीर समस्येचं लक्षण सुद्धा असू शकतं. अशा अनेक समस्या तुम्हाला जाणवू शकता.
उपचार आणि काळजी
हार्ट ब्लॉकेजची लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे तपासणी करणं आवश्यक आहे. काही रुग्णांना औषधांनी आराम मिळतो. पण गंभीर परिस्थितीत अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागू शकते. तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायाम, संतुलित आहार, धूम्रपान टाळून आणि ताणतणाव कमी करून हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.