तिशीतच हार्ट अटॅक येण्यामागचं कारण काय? '२' पांढरे पदार्थ ठरतात कारणीभूत, आजच सोडा

Early Heart Attacks in Young Adults: बदललेली जीवनशैली, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल आणि ताणतणाव या प्रमुख कारणांमुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो.
Early Heart Attacks in Young Adults
Early Heart Attacks in Young AdultsSaam
Published On

ह्रदयविकाराचा झटका, हार्ट ब्लॉकेज, उच्च कोलेस्टेरॉल आणि हाय बिपी यांसारख्या आरोग्याशी निगडीत समस्या वाढत चालल्या आहेत. पूर्वी सामान्य व्यक्तीला ह्रदयविकार पन्नाशीनंतर येत होते. मात्र, तिशीच्या आतच अनेकांनी ह्रदयविकाराचा झटका येत आहे. आजकाल २० -३० वयोगटातील तरूणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत चाले आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. बदललेली जीवनशैली, आहारात बदल यांसह इतर कारणांमुळे शरीरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.

नारायण सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे सीनियर डायरेक्टर, डॉक्टर हेमंत मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये दीड पटीने वाढ झाली आहे. ४० वर्षांखालील लोकांना ह्रदयविकाराचा झटका येत आहे. या मागची प्रमुख कारणे म्हणजे, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, आजकाल लोकांमध्ये जंक फूडचे क्रेझ आहे. तसेच हालचालीच्या अभावांमुळे ह्रदयच्या समस्या वाढतात.

Early Heart Attacks in Young Adults
मुंबई ते पुणे गाठा अवघ्या ३० मिनिटांत, हेलिकॉप्टरने अनुभवा सुंदर प्रवास; तिकीटांची किंमत किती?

व्यायाम करा

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, व्यायाम हा ह्रदयसाठी सर्वोत्तम औषध मानले जाते. कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि शरीरात लवचिकता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचं आहे. तसेच दररोज १० हजार पावले चाला.

३ पदार्थ खाणं टाळा

आहारात ह्रदयाचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे जास्त कार्बोहायड्रेटस. वारंवार गरम करून वापरलेले तेल, खूप जास्त साखर आणि मीठ, आरोग्यासाठी घातक ठरतात. आपण आहारात नियमित अंदाजे १२-१३ ग्रॅम मीठ वापरतो. ५ ग्रॅमहून अधिक मीठ खाल्ल्यास ह्रदयावर अतिरिक्त ताण येतो.

Early Heart Attacks in Young Adults
बदनामी करणे हाच काँग्रेसचा धंदा! पुण्यात मतदार यादीत फेरफार केल्याचे आरोप फेटाळत भाजपचे चोख प्रत्युत्तर

सुरूवातीची लक्षणे

डॉक्टरांनी स्पष्ट केले, छातीत दुखणे, चालताना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, अचानक थकवा या गोष्टी दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांनी जीवनशैलीत बदल करून आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com