Heart Attack: ना हार्टचं दुखणं ना BPचा त्रास...तरीही येतो हार्ट अटॅक; ही लक्षणे वेळीच ओळखा

Cardiac Care: हार्टचा आजार किंवा बीपी नसतानाही हार्ट अटॅक येऊ शकतो. स्ट्रेस, हाय कोलेस्टेरॉल आणि सिडेंटरी लाइफस्टाइल ही मोठी कारणे आहेत. लक्षणे वेळीच ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Heart Attack Prevention Tips
High cholesterol causesgoogle
Published On

सध्याच्या जीवनशैलीमध्ये पुर्वी पेक्षा कितीतरी पटीने बदल झाले आहेत. आता लोकांना फीट राहायला खूप आवडतंय. लोक महागड्या जीममध्ये जाणं पसंत करत आहेत. महिला पुरुष दोघांचाही यामध्ये समावेश आहे. काही लोक उत्तम डाएट फॉलो करतात. चांगल हेल्दी खातात म्हणजे हेल्दच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेत नाहीत. पण तज्ज्ञांनी एक मोठी समस्या स्पष्ट केली आहे.

काही लोक दिवसभर कामात असतात. सध्या सगळ्यांना उत्तम लाइफस्टाइल आणि त्यांची मोठी स्वप्न पुर्ण करायची असतात. त्यामुळे लोक खूप मेहनत घेतात. काम करतात. पण पुर्वी लोक शारिरीक श्रम जास्त करायचे आता ते चित्र पुर्णपणे बदलले आहे. आता लोक एका जागी ऑफीसमध्ये बसून काम करतात. पण त्याने त्यांचा स्ट्रेस खूप वाढतोय. घरातलं टेन्शन, वाढती महागाई, प्रवासांची दगदग यासगळ्यामुळे त्यांना कमी वयातच हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. काहींचा असा समज असतो की, कोणताच ह्रदयरोग नसताना, बीपीचा त्रास नसताना हार्ट अटॅक कसा येतो? याचं हे एक गंभीर कारण आहे.

Heart Attack Prevention Tips
Mini Samosa Recipe: हॉटेलसारखा मिनी समोसा बनवण्याची ही १ ट्रिक वापरा, मुलांच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन

चाळीशीनंतर पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो, तर महिलांमध्ये मेनोपॉजच्या अवस्थेनंतर याचा धोका वाढतो. याने हाय कोलेस्टेरॉल आणि हायपरटेन्शनची लक्षणं आढळतात. जास्त स्ट्रेस घेतल्याने बीपी वाढतो. यामध्ये थकवा, छातीत दुखणं, जबडा, मान आणि पाठीत दुखणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फक्त हेल्दी राहणं म्हणजे उत्तम लाइफस्टाईल नाही. तुमच्या कुटुंबात जर कोणाला हार्ट संबंधित त्रास असतील तर तुम्ही २० वर्षानंतर काही बेसिक टेस्ट केल्या पाहिजेत. त्यामध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी, बीपीचा त्रास यांसारख्या बेसिक तपासण्या फॅमिली डॉक्टरांना सांगून केल्या पाहिजेत. कारण याच गंभीर समस्यांनी तुमच्या नकळत तुम्हाला अचानक हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heart Attack Prevention Tips
Chanakya Niti: सतत अपमान करणाऱ्यांचा कसा घ्याल बदला? या ४ गोष्टी मरेपर्यंत ठेवा लक्षात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com