Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना घरच्यापेक्षा बाहेरचे पदार्थ खायला प्रचंड आवडतं. पण ते त्यांच्या शरीरासाठी पौष्टीक नसतात.
तुम्ही घरच्याघरी स्वच्छ पद्धतीने आणि सोप्या ट्रिक्सने मिनी समोसे बनवू शकता. पुढे आपण याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
उकडलेले मटार आणि बटाटे, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, आमचुर पावडर, कसुरी मेथी, मैदा, तूप, जिरं, मटार, आलं इत्यादी साहित्य पुरेसं आहे.
सर्वप्रथम हिरवी मिरची आणि आल्याच्या तुकड्याची एक पेस्ट बनवून घ्या. दुसरीकडे मैद्याचे पीठ मळून घ्या.
पीठ मळताना त्यात ३ चमचे तूप किंवा तेल , मीठ आणि जिरं घालून कोमट पाण्याचा वापर करा. तयार पीठ झाकून ठेवा.
आता उकडलेला बटाटा हाताने मॅश करुन घ्या. एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घ्या.
फोटणीमध्ये जिरं, आल्याची पेस्ट मस्त परतून घ्या. मग त्यात मसाले मिक्स करा आणि शेवटी मटार आणि बटाटा मिक्स करुन छान परतून घ्या.
तयार भाजी थंड करा. मग पीठाच्या पुऱ्या लाटा. मग त्या मध्ये कट करुन अर्धगोल करा. त्यात तयार भाजी भरुन कडा पाणी लावून बंद करा.
आता सगळे समोसे तयार करा. मग एका कढईत तेल गरम करुन छान परतून घ्या. हे समोसे तुम्ही पुदीन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.