Heart Attack : झोपण्याआधी फक्त ही एक गोष्ट करा; हार्टअटॅक अन् स्ट्रोकचा धोका टळणार

Drink Water: झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकते. तज्ज्ञांनी सांगितलेली ही सोपी पण जीव वाचवणारी सवय आहे.
heart attack prevention
stroke prevention tipsGoogle
Published On

झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. ही सवय काही रुग्णांनी फॉलो केली तर त्यांचा जीव वाचू शकतो. असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कारण सध्याच्या धावपळीत बाहेरचं, उशीरा पर्यंत काम करणं, त्यामुळे उशीरा झोपणं, उशीरा उठणं, व्यायाम टाळणं या सामान्य वाटणाऱ्या सवयींकडे लोक दुर्लक्ष करतात. पण याने तुमचा जीव वाचू शकतो. असं तज्ज्ञ म्हणतात. पुढील लेखात आपण याबद्दल तज्ज्ञांचे मत आणि त्यांनी दिलेला महत्वाचा सल्ला जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपेत असताना शरीरातून श्वासोच्छ्वास आणि घामाच्या माध्यमातून तुमच्या शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. अशा वेळी रक्त थोडं जाड होण्याचीही शक्यता असते, हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. हा ताण बरेच दिवस असेल तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

heart attack prevention
Cholesterol: नारळाच्या दुधामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? कोलेस्टेरॉलवरही होतो 'हा' परिणाम, जाणून घ्या सत्य

झोपण्याच्या अगोदर साधारण १५० ते २०० मिली इतकं साधं पाणी पिण्याची सवय सगळ्यांनाच असली पाहिजे. पाणी हे झोपण्याच्या अगदी क्षणभर आधी पिणं टाळा, कारण त्याने रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागू शकतं आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी पाणी पिणं योग्य आहे. असं तज्ज्ञ म्हणतात.

तसेच, वाढत्या वयासोबत शरीरातल्या पाण्याची गरज ओळखण्याची क्षमता कमी होत जाते. अनेकदा तहान लागत नाही म्हणून लोक पाणी पिणंच टाळतात. ज्याचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः हाय ब्लड प्रेशर, डायबेटीज किंवा तणावाची जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींनी हायड्रेशनकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

heart attack prevention
Cancer: सकाळी उठल्यावर बेडशीट ओली दिसतेय? कॅन्सरचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com