संशोधन! 'हा' सेन्सर देईल हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी चेतावनी

संशोधकांनी एक सेन्सर विकसित केला आहे जो तीस मिनिटांपेक्षा कमी वेळात हृदयविकाराचा झटका येणार आहे का हे ओळखू शकतो.
संशोधन! 'हा' सेन्सर देईल हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी चेतावनी
संशोधन! 'हा' सेन्सर देईल हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी चेतावनीSaam TV
Published On

संशोधकांनी एक सेन्सर विकसित केला आहे जो तीस मिनिटांपेक्षा कमी वेळात हृदयविकाराचा झटका येणार आहे का हे ओळखू शकतो. म्हणजेच, त्याची लक्षणे ओळखून, तो रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी चेतावणी देऊ शकतो. यामुळे ग्रस्त व्यक्ती वेळेवर प्रतिबंध आणि योग्य उपचारांसाठी उपाययोजना करु शकतो. नवीन संशोधनात सांगितले आहे की तीन वेगळ्या प्रकारचे मायक्रोआरएनए सापडले आहेत. एक सेन्सर हा हृदयविकाराचा झटका किंवा इतर काही रोग जसे की समान लक्षणांसह, रक्त प्रवाह मंद होणे किंवा इतर कोणतीही समस्या आहे हे शोधण्यात सक्षम असेल. पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत त्याचे निदान करण्यासाठी खूप कमी रक्त चाचण्यांची आवश्यकता असते.

संशोधन! 'हा' सेन्सर देईल हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी चेतावनी
20 कोटीची लाॅटरी जिंकला भारतीय, पण विजेता गायब; जाणून घ्या कारण

विकसनशील देशांमध्ये निदान उपाय शोधले जाऊ शकतात

नोट्रेडम विद्यापीठाचे सुह-चिया चांग म्हणाले की या स्वस्त उपकरणामुळे विकसनशील देशांमध्ये क्लिनिकल सोल्यूशन्स होऊ शकतात. नोटरेडम आयडिया ही स्टार्टअप कंपनी हे उपकरण तयार करते. नोटरेडम आयडिया सेंटर सध्या एका चिपवर काम करत आहे. हा सेन्सर हार्ट अटॅक आल्यास इकोकार्डियोग्राम प्रमाणे काम करतो. परंतु रुग्णाला फक्त हृदयविकाराचा झटका आला आहे, यासाठी रक्ताचा नमुना आवश्यक आहे. या प्रक्रियेला आठ तास लागतात.

हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा 'ही' सामान्य लक्षणे असतात

हृदयविकाराच्या चार रुग्णांपैकी एकाला असामान्य लक्षणे असतात जसे की दम लागणे, प्रचंड थकवा आणि ओटीपोटात दुखणे. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना आपत्कालीन मदत मिळण्याची शक्यता कमी असते. छातीत दुखत असलेल्या लोकांपेक्षा त्यांना हृदयाचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, लवकरात लवकर रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com