गाणी कोणाला आवडत नाही. गाणी गुणगुण्यापासून ते त्यावर थिरकायला प्रत्येकाला आवडतात. गाणी ऐकण्यासाठी हल्ली सगळेच इअरफोन्सचा वापर करतात. इअरफोन्स हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनशैलीचा (Lifestyle) महत्त्वाचा भाग बनला आहे.
परंतु, इयरफोनचा अतिवापर केल्याने केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही तर हृदयाशी संबंधित समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत इअरफोन अधिक वापरण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
हल्ली हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack) कारणे अधिक प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम तरुणांवर दिसून येत आहे. याचे कारण बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व तंत्रज्ञान हे देखील महत्त्वाचे कारण आहे.
हेडफोन जास्त वेळ लावल्याने आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. वास्तविक, इअरफोन किंवा हेडफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर परिणाम होतो. इयरफोनच्या अतिवापरामुळे अनेक वेळा आवाजाचा भ्रम निर्माण होतो.
इअरफोनचा अतिवापर केल्याने आपल्या कानावरच परिणाम होत नाही तर हृदयाच्या समस्या देखील होतात. हे हृदय गती वाढवते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.
अनेक वेळा लोक एकमेकांशी हेडफोन्सची देवाणघेवाणही करतात, असे केल्याने इयरफोन स्पंजद्वारे बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, अशा स्थितीत कानात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
जास्त वेळ कानात इअरफोन ठेवल्याने कानाच्या नसांवर दबाव येतो, नसांना सूज येण्याचीही शक्यता असते. कंपनामुळे ऐकण्याच्या पेशी त्यांची संवेदनशीलता गमावतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.