How to survive heart attack : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय कराल ? डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स

असंतुलित जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानाची सवय आणि त्यामुळे होणारे आजार ही हृदयविकाराची प्रामुख्याने लक्षणे आहेत.
How to survive heart attack
How to survive heart attack Saam Tv

How to survive heart attack : हल्ली हृदयविकाराचा झटका येणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे प्रमाण तरुणवयातील अनेकांनामध्ये दिसत आहे. हा झटका प्रत्येकासाठी भयानक अनुभव असतो.

असंतुलित जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानाची सवय आणि त्यामुळे होणारे आजार ही हृदयविकाराची प्रामुख्याने लक्षणे आहेत. कधीकधी हृदयविकाराचा झटका आनुवंशिक कारणांमुळे देखील येऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपले आयुष्य काही वर्षांनी कमी होते हे जरी खरे असले तरी आपले आयुष्य संपत नाही. पण बरेच वेळा यात आपल्याला जीवही गमवावा लागतो. आपल्या जवळच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करायला हवे ? अशावेळी आपण काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. हृदयविकाराचा झटका कसा टाळावा किंवा ज्याला हृदयविकाराचा झटका आला असेल त्याला कशी मदत करावी हे देखील पाहूया

How to survive heart attack
Heart Care Tips : हृदयाच्या 'या' समस्यांकडे अधिक लक्ष द्या, रहाल हृदयविकाराच्या झटक्यापासून लांब !

क्लीव्हलँड क्लिनिकचे डॉक्टर असे म्हणतात, हृदयविकाराच्या झटक्यातून आपण कधी बरे होऊ हे त्याचा लक्षणावरून समजते. हृदयविकाराचा झटका हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतो. तसेच मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रुग्णांना देखील तो वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. परंतु सामान्यतः हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, छातीत दाब येणे, अपचन, मळमळ, अत्यंत थकवा, श्वास लागणे आणि सामान्यतः अस्वस्थ वाटणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

1. हृदयविकाराचा झटका आला नसेल परंतु, तशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरीत रुग्णवाहिकेला कॉल करा. डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घ्या.

2. डॉ. ग्रँट रीड, एक इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि क्लीव्हलँड क्लिनिकच्या STEMI प्रोग्रामचे संचालक म्हणतात की, बरेच रुग्ण त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्या हृदयाचे स्नायू आधीच मृत झालेले असतात. तुम्हाला हृदयविकाराचा झटका कधी येऊ लागतो. यावर अवलंबून असते.

How to survive heart attack
Fruits For Healthy Heart : हृदयाचे आरोग्य जपायचे आहे ? 'ही' फळे खा, हृदयविकाराच्या धोक्याला बाय बाय करा !

3. मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीमचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. जोएल बीचे शिफारस करतात की जर तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack) लक्षणे दिसली तर रुग्णवाहिका बोलवल्यानंतर एस्पिरिनचा पूर्ण 325 मिलीग्राम डोस घ्या. खरेतर, एस्पिरिन घेतल्याने तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह रोखला जातो. त्यासाठी ते औषध गिळण्याऐवजी चघळण्यासा सांगितली जाते.

4. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब अॅम्ब्युलन्सला कॉल करा तसेच सोबत कोणाला तरी घेऊन जा. ज्यामुळे लक्षणे आणखीनच बिघडल्यास हे तुम्हाला अधिक चांगली मदत करू शकते.

5. जर हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला श्वास घेता येत नसेल तर रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी CPR (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) सुरू करा. आपण प्रथम आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कॉल करा आणि नंतर CPR सुरू करा. केवळ हँड्स-ओनली सीपीआरसाठी आवश्यक आहे की तुम्ही व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी जोरदार आणि जलद दाब द्यावा. एका मिनिटाला सुमारे 100 ते 120 कॉम्प्रेशन्स - पॅरामेडिक्स येईपर्यंत दाब देत रहा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com