Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

Heart attack - हार्ट अटॅक ही एक अशी मेडिकल इमर्जन्सी आहे, ज्यामध्ये एक-एक मिनिट खूप आपल्यासाठी खुप महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत तुम्ही कधी एकटे असाल, तर घाबरून जाण्याऐवजी समजूतदारपणाने काम घ्या.
Heart attack
Heart attackmeta ai
Published On: 

हार्ट अटॅकसारख्या स्थितीत एकटे असताना लोक खूप घाबरतात. ते इकडे-तिकडे पळू लागतात किंवा स्वतःच गाडी चालवून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा परिस्थितीत स्वतःला जास्त थकवणे योग्य नाही, कारण या काळात शरीराचा ऑक्सिजन पुरवठा आधीच कमी होऊ लागतो. अशा वेळी तुम्ही जितकी पळापळ कराल आणि स्वतःला थकवाल, तितकी शरीराची ऑक्सिजनची गरज वाढेल आणि तुमच्या हृदयावरील ताण अधिक वाढेल. डॉक्टर सल्ला देतात की, अशा स्थितीत तुम्ही एकाच जागी आरामात बसावे.

घरी एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास करा ही कामे:

1. त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या (Emergency Medical Help)-

पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे वैद्यकीय मदत घेणे. तुम्ही अशा स्थितीत एकटे असाल, तर स्वतः गाडी चालवण्याऐवजी तात्काळ इमर्जन्सी हेल्पलाइन नंबरवर उदा. ११२ किंवा रुग्णवाहिकेला कॉल करा. याशिवाय, तुमच्या एखाद्या खास नातेवाईकाला किंवा जवळच्या व्यक्तीला कॉल करा, जेणेकरून ते तातडीने मदतीसाठी पोहोचू शकतील.

Heart attack
Heart Attack : 'हे' ४ पदार्थ रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, हार्ट अटॅकचा धोका वाढवतात; आजपासूनच खाणे टाळा

2. एस्पिरिनची गोळी चघळून खा

हार्ट अटॅकची लक्षणे जाणवल्यास तुम्ही त्वरित एस्पिरिनची किंवा डिस्प्रिनची गोळी घेऊ शकता. तुमच्याकडे ३२५ एमजीची एस्पिरिनची गोळी असल्यास ती चघळून किंवा पाण्यात विरघळवून घ्यावी. लक्षात ठेवा, ती सरळ गिळू नका, अन्यथा ती शरीरात खूप हळूहळू काम करते.

3. स्वतःला जास्त थकवू नका

हार्ट अटॅकसारख्या स्थितीत एकटे असताना लोक खूप घाबरतात. ते इकडे-तिकडे पळू लागतात किंवा स्वतःच गाडी चालवून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा परिस्थितीत स्वतःला जास्त थकवणे योग्य नाही, कारण या काळात शरीराचा ऑक्सिजन पुरवठा आधीच कमी होऊ लागतो. अशा वेळी तुम्ही जितकी पळापळ कराल आणि स्वतःला थकवाल, तितकी शरीराची ऑक्सिजनची गरज वाढेल आणि तुमच्या हृदयावरील ताण अधिक वाढेल. डॉक्टर सल्ला देतात की, अशा स्थितीत तुम्ही एकाच जागी आरामात बसावे.

Heart attack
Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

टीप: स्वतःहून 'सॉर्बिट्रेट' Sorbitrate गोळी घेऊ नका कारण अनेक जण हार्ट अटॅकची लक्षणे जाणवल्यास सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवतात. मात्र, हे धोकादायक ठरू शकते. ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. तुमचा बीपी वाढलेला असेल तर ही गोळी फायदेशीर ठरू शकते. परंतु, जर तुमचा बीपी आधीच कमी असेल तर यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे:

छातीत वेदना जाणवणे, वेदना खांदा, दात/जबडा, हात आणि पाठीपर्यंत पसरणे. श्वास घेण्यास त्रास होणे, थंडगार घाम येणे, अचानक चक्कर किंवा अशक्तपणा जाणवणे, मळमळणे किंवा उलट्या होणे, अचानक खूप जास्त थकवा किंवा अस्वस्थता जाणवणे.

(टीप: कोणत्याही आरोग्याच्या समस्या जाणवत असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com