Healthy Fruit : बेलाच्या फळाचे आहेत आरोग्याला आश्चर्यकारक फायदे! या आजारांपासून मिळेल मुक्ती

Bael Fruit Benefits : बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो.
Healthy Fruit
Healthy FruitSaam Tv
Published On

Bael Fruit :

बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती पिवळी होतात. बेल फळाचा रस बनवला जातो.

जरी सर्व फळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत, परंतु बेल हे असे फळ आहे की ते खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. या फळाचे सेवन केल्यावर आपल्या शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होतात.

बेलाच्या फळांचा हंगाम हा उन्हाळ्यात येतो.तसेच या फळांचा रस प्यायल्याने तर तुमच्या पोटाच्या समस्याही दूर होतात. याशिवाय शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर करता येतात. आज आम्ही तुम्हाला या बेलाच्या फळाबद्दल सांगणार आहोत. हे फळ त्याचे फायदे सांगणार आहोत. बेल फळ आहे जे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर (Benefits) ठरते.

हृदय मजबूत करते

हृदयाशी संबंधित रुग्णांनी बेलाच्या फळाचे सेवन करावे. याचा तुमच्या हृदयाला खूप फायदा होतो. या फळामध्ये अनेक फायदेशीर पोषक तत्व असतात जे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात.

Healthy Fruit
Healthy Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यात खा हे 8 सुपरफूड, दिवसभर टिकून राहिल एनर्जी

अॅनिमियाची समस्या दूर होते

ज्यांना अशक्तपणाची समस्या आहे किंवा लाल रक्तपेशींची कमतरता आहे किंवा त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांनी बेलाच्या फळाचे सेवन करावे. बेलामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे शरीरातील अॅनिमियाची समस्या सहज दूर होते.

मूळव्याध रुग्णांना फायदा होतो

मूळव्याध ग्रस्त लोक. गुदाशयाच्या आजूबाजूच्या भागाला सूज येते आणि वेदना तीव्र होतात अशा लोकांसाठी बेलाचे फळ खाने खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये फायबर आढळते जे मूळव्याधांवर खूप फायदेशीर आहे. संपूर्ण हंगामात याचे सेवन केल्यास मूळव्याधची समस्या दूर होते.

Healthy Fruit
Healthy Fruits For Winter: सकाळी ही ३ फळे खा अन् निरोगी राहा

डोळ्यांसाठी फायदेशीर आहे

डोळे निरोगी ठेवण्यासाठी बेलाचे फळ सर्वात फायदेशीर आहे, कारण या फळामध्ये जीवनसत्त्वे आढळतात ज्यामुळे दृष्टी सुधारते.

कॉलरा झाल्यास फायदा होतो

कॉलरा हा जीवाणूजन्य संसर्ग आहे. या संसर्गामुळे जुलाब आणि उलट्या होतात. हे टाळण्यासाठी, या फळाचे खूप महत्त्व आहे, कारण या फळामध्ये अतिसार विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे कॉलरासारख्या समस्या दूर होतात.

Healthy Fruit
Fruits Side Effects: थंडीत चुकूनही ही फळे खाऊ नका

डोकेदुखीवर हा रामबाण उपाय आहे

जर एखाद्याला नेहमी डोकेदुखी होत असेल तर त्याने बेलाच्या फळाचे सेवन करावे. बेलाच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने मायग्रेनच्या रुग्णांना खूप आराम मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com