Ginger Side Effects: उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Ginger Side Effects in Marathi: अद्रकचं जास्त सेवन केल्याने एलर्जी देखील होते. त्वचेवर लाल चट्टे उमटणे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात. काही व्यक्तींना तोंड येण्याची सुद्धा ऍलर्जी होते.
Ginger Side Effects: उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
Ginger Side Effects Explained in MarathiSaam TV

चहा आणि विविध भाज्यांमध्ये विविध मसाल्यांसह अद्रक महत्वाचं असतं. अद्रकमुळे पदार्थाची चव आणखी छान आणि रुचकर लागते. अद्रक गरम असते. त्यामुळे आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. अद्रक खाल्ल्याने सर्दी-खोकला देखील कमी होतो. मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशा उन्हात जर तुम्ही अद्रक खाल्लं तर आरोग्यावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

Ginger Side Effects: उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
Health Tips: तुम्हाला पण आंबट ढेकर येत आहेत का? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

डिहायड्रेशन

अद्रक शरीरासाठी उष्ण असतं. यामध्ये उष्णता जास्त असल्याने शरीराचं तापमान देखील वाढतं. यामुळे तुम्हाला जास्त गरम होणे, घामोळे येणे, घाम येणे, शरीरातील पाणी पटकन कमी होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे डिहाइड्रेशनपासून वाचण्यासाठी अद्रकचे सेवन जास्त करू नये.

पचन समस्या

अद्रक उष्ण असल्याने उन्हळ्यात अद्रकचे जास्त सेवन केल्यास शरीरातील पित्त वाढतं. त्यामुळे जळजळ, अॅसिडीटी अशा समस्या जाणवतात. अद्रक तिखट देखील असतं, त्यामुळे जास्तप्रमाणात याचं सेवन केल्याने आतड्यांना देखील त्रास होऊ शकतो.

ऍलर्जी

अद्रकचं जास्त सेवन केल्याने एलर्जी देखील होते. त्वचेवर लाल चट्टे उमटणे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात. काही व्यक्तींना तोंड येण्याची सुद्धा ऍलर्जी होते.

लो ब्लड प्रेशर

अद्रकचं अधिक सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. यामुळे चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यात कोणत्याही भाजीत आणि चहामध्ये सुद्धा अद्रक खाऊ नये.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही अद्रक बद्दल या माहितीचा दावा करत नाही.

Ginger Side Effects: उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
Rainy Season Health Tips: बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची कशी काळजी घ्याल? फॉलो करा टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com