Health tips : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दिवसाची सुरुवात ही चहा कॉफीच्या सेवनाने करायची सवय असते. काहींना तर सकाळी चहा-कॉफी न प्यायल्याने काम करण्याची इच्छा होत नाही.
हे देखील पहा -
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नाही सकाळी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास आपल्याला शरीराला यामुळे नुकसान मिळू शकते. रिकाम्या पोटी सकाळी चहा प्यायल्याने शरीरातील आतड्यांना त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच यामुळे रक्तदाब, हृदयाची गती आणि श्वासोच्छवासाच्या गतीवर परिणाम करू शकतो. सकाळी उठल्याबरोबर चहा-कॉफी किंवा सिगारेटसारख्या गोष्टींचा वापर करणे ही वाईट सवय आहे. दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने का करू नये आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया (side effects of drinking tea and coffee)
१. दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने केल्यास त्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेवर होतो. यातील घटक रक्तातील साखर (Sugar) वाढवते आणि पेशींचे पोषण कमी करते. याशिवाय सकाळचा चहा किंवा कॉफी (Coffee) शरीरातील आम्ल-क्षार संतुलन बिघडवून मळमळ सारख्या समस्या वाढवते. त्यामुळे सकाळचा चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
२. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने आपली भूक कमी होते. याच्या सेवनामुळे आपल्या अधिक काळ भूक लागत नाही व जास्त वेळ काही न खाल्ल्यामुळे आपल्याला चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच, अशा स्थितीत आपल्याला काहीही खावेसे वाटत नाही. या सवयीमुळे चयापचय क्रिया मंदावते आणि त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.
३. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीमुळे गॅस्ट्रिक समस्या वाढू शकतात. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्याने गॅस्ट्रिक पेशी उत्तेजित होतात, ज्यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.
४. तसेच कॉफी व चहा रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते व यात असणारे कॅफिन आपल्या मूत्रपिंडाला हानी होते. यामुळे आपल्या किडनी स्टोनची समस्या देखील होते.
५. बऱ्याच जणांना असे वाटते की, चहा व कॉफी प्यायल्याने आपल्या थकवा नाहीसा होतो. झोपेची समस्या नाहीशी होते पण याचे सेवन केल्याने आपल्या पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे आपल्या डोकेदुखी, झोपेची समस्या व अशक्तपणाची समस्या जाणवू लागते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.