Winter Skin Care: थंडीत त्वचा कोरडी होतेय? मुलायम त्वचेसाठी स्किन केअरमध्ये करा या गोष्टींचा समावेश

Skin Care: थंडीत त्वचा कोरडी पडणे, त्वचेची साल निघणे अशा समस्या होतात.
Winter Skin Care
Winter Skin CareSaam Tv
Published On

Homemade Remedies For Winter Skin Care:

राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. गुलाबी थंडीसोबतच आजारपणदेखील आले आहे असे म्हणायला हरकत नाही. थंडीत अनेक आजार होतात. थंडीत सांधे दुखणे, सर्दी खोकला असे आजार होतात. त्वचेच्या अनेक समस्या होतात.

थंडीत त्वचेचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते. त्वचा कोरडी पडणे, त्वचेची साल निघणे अशा समस्या होतात. त्यामुळे थंडीत त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. त्वचेच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने ओठ कोरडे पडतात. या परिस्थितीत त्वचेवर परिणामकारक असलेले उपाय करायला हवे. आज आम्ही तुम्हाला थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत.

1. खोबरेल तेल

रात्री झोपताना चेहऱ्यावर आणि ओठांवर खोबरेल तेल लावा. रात्रभर तेल राहिल्याने त्वचा मॉईश्चर होण्यास मदत होते. त्वचा मॉईश्चर झाल्यावर छान दिसते. तुम्ही दिवसाही ओठांना तेल लावू शकतात. खोबरेल तेल घरात उपलब्ध असते. तसेच ते त्वचेसाठी चांगले असते.

2. मध

मध खालल्याने अनेक फायदे होतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. मध ओठांना लावल्यास ओठ मऊ होतात. मधात थोडे ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण ओठांना लावा. त्यानंतर काही वेळाने ओठ धुवून टाका. असे केल्याने ओठ मुलायम ठेवण्यास मदत होते.

3. तूप

थंडीत तूप खाणे खूप महत्त्वाचे असते. तूप खालल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आजार दूर होतात. तसेच त्वचेसाठीही तूप फायदेशीर आहे. तूप खालल्याने त्वचा तजेलदार दिसते. ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ओठांवर तूप लावा. त्यामुळे ओठ मऊ होतात. दिवसातून २-३ वेळा ओठांना तूप लावावे.

Winter Skin Care
Gardening Tips: घराच्या समोर लावा ही झाडे; घराच्या सौंदर्यासोबत शरीरालाही होतील अनेक फायदे

4. शुगर स्क्रब

शुगर स्क्रब हे त्वचेसाठी चांगले असते. त्वचा हाताने काढल्याने रक्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वचा न काढता साखरे थोडेसे मध घालून ते मिश्रण ओठांवर लावावे. त्यामुळ त्वचेची साल आपोआप निघून येईल.

5. लिप बाम

लिप बाम ओठांवर लावल्याने ओठ मऊ राहतात. लिप बाम लावल्याने त्वचा ओलसर राहते. तुम्ही घराबाहेर जाताना ओठांना लिपबाम लावू शकतात. त्यामुळे ओठ चांगले दिसतात.

6. मॉईश्चरायझर

थंडीत नेहमी त्वचेला मॉइश्चराईझर लावावे. मॉईश्चराईझर लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तुम्ही रात्री त्वचेला मॉईश्चराईझर लावू शकतात. मॉईश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ होते.

Winter Skin Care
IB Recruitment 2023 : तरूणांसाठी सरकारी जॉबची संधी! Intelligence Bureauमध्ये करा अर्ज, मिळेल लाखों रुपयांचे पॅकेज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com