Winter Skin Care :हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी होते? खाज येते? अशी घ्याल त्वचेची काळजी

Skin Care:थंडीत त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी.
Winter Skin Care
Winter Skin Care Saam Tv
Published On

Winter Skin Care Routine:

सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडीला सुरुवात झाली आहे. तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे प्रदुषणात वाढ झाली आहे. यावेळी त्वचेवर खूप जास्त परिणाम होतो. त्यामुळे या काळात त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी.

प्रदुषण आणि थंडीमुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आल्यासारखे वाटते. डाग दिसून येतात. यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. त्यामुळे त्वचेकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

थंडी अन् प्रदुषणामुळे होणारे आजार

त्वचेचा कोरडेपणा हा नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असतो. नैसर्गिक आद्रतेच्या पातळीवर त्वचेचं सौंदर्य अवलंबून असते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेवर खूप जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट ठेवावे. कोरडेपणामुळे त्वचेला खूप जास्त नुकसान होऊ शकतो. हिवाळ्यात कोरडी त्वचा, खाज सुटणे अशा अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे त्वचेतून पाणी येऊ शकते. यामुळे अॅलर्जी होऊ शकते.

त्वचेचे होऊ शकतो नुकसान

हिवाळ्यातील थंड हवा आणि प्रदुषणामुळे त्वचेसंबंधित आजार होऊ शकतात. हिवाळ्यात त्वचेच्या छिद्रात घाण साचते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा कोरडी होते. त्यामुळे पिंपल्स आणि पिंगमेंटेशनची समस्या येऊ शकते.

Winter Skin Care
Call Recording : तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड करतंय का? 'या' आवाजाने येईल ओळखता, वाचा सविस्तर

त्वचेची काळजी अशी घ्या

  1. हिवाळ्यात घराबाहेर पडताना स्कार्फ, मास्क लावून पडावे.

  2. घराबाहेरुन पुन्हा घरात आल्यावर तोंड स्वच्छ धुवावे.

  3. घरी आल्यावर स्कीन केअर करावे.

  4. रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावावे.

Winter Skin Care
Chanakya Niti Quotes : आयुष्यात 'या' गोष्टी आहेत कटू सत्य, चाणक्यांचे वाचा हे कानमंत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com