Chanakya Niti Quotes : आयुष्यात 'या' गोष्टी आहेत कटू सत्य, चाणक्यांचे वाचा हे कानमंत्र

Quotes : काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात.
Chanakya Niti Quotes
Chanakya Niti QuotesSaam tv
Published On

Chanakya Niti :

काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात. जाणून घ्या कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. असे काही तुमच्यासोबत कधी घडले असेल तर चाणक्यांचे हे शब्द लक्षात ठेवा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य यांचे हे शब्द कडू असले तरी ते आपल्या जीवनावर खोलवर परिणाम (Effect) करतात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करतात. चला तर मग जाणून घेऊया त्या चाणक्य धोरणांबद्दल जे तुमचे जीवन बदलतील.

जीवनात यश मिळवण्याचा मूळ मंत्र कोणता?

  • चाणक्य म्हणतो की कोणी तुमचा गैरफायदा (Disadvantage) घेईल इतके सरळ होऊ नका.

  • इतके गोड बोलू नका की तुमचे बोलणे समोरच्याला जास्त चांगले वाटेल.

  • जिंकण्यासाठी तुम्हाला इतरांसमोर नतमस्तक होणे आवश्यक आहे.

Chanakya Niti Quotes
Chanakya Niti: यशाला गवसणी घालायचीये? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा
  • आयुष्याकडून आणि माणसांकडून फार अपेक्षा ठेवू नका हे कटू पण खरं आहे.

  • तुमची आर्थिक स्थिती बिघडणार नाही एवढेच दान करावे. तुमची आर्थिक परिस्थिती जेवढी परवानगी देईल तेवढीच देणगी द्या.

  • असे मित्र बनवा जे तुम्हाला आयुष्यभर साथ देतील म्हणजेच चांगले मित्र बनवा नाहीतर बनवूच नका.

Chanakya Niti Quotes
Chanakya Niti: श्रीमंत कसं व्हायचं? चाणक्यांनी सांगितलेला 'हा' मार्ग अवलंबवा, यश पायाशी लोळेल
  • तुमच्या उणिवा कोणालाही सांगू नका कारण असे बरेच लोक आहेत जे संधी दिसताच त्यांचा फायदा घेऊ शकतात.

  • भूतकाळाबद्दल विचार करून पश्चात्ताप करू नका. जे गेले ते विसरा.

  • इतरांच्या आणि स्वतःच्या चुकांमधून शिका. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत नसाल तर किमान इतरांच्या चुकांमधून तरी शिका.

  • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com