IB Recruitment 2023 : तरूणांसाठी सरकारी जॉबची संधी! Intelligence Bureauमध्ये करा अर्ज, मिळेल लाखों रुपयांचे पॅकेज

IB ACIO Recruitment 2023 : गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 992 पदांसाठी भरती होणार आहे.
IB Recruitment 2023
IB Recruitment 2023 Saam Tv
Published On

IB Recruitment :

इंटेलिजन्स ब्युरोने काल म्हणजेच 21 नोव्हेंबर 2023 रोजी बंपर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहिर केली आहे. Intelligence Bureau (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/कार्यकारी पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गृह मंत्रालयाच्या या भरतीची (Recruitment) अधिसूचना 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2023 च्या रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 995 पदे भरण्यात येणार आहेत. खाली भरतीशी संबंधित अधिक तपशील जाणून घ्या.

अर्ज कधी करू शकता?

अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. 15 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवार नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन भरू शकतील. 19 डिसेंबरपर्यंत SBI चालान मोडद्वारे फी भरता येईल. अर्ज करण्यास इच्छुक असलेले आणि पात्रता पूर्ण करणारे उमेदवार गृह मंत्रालयाच्या mha.gov.in या वेबसाइटवर (Website) सक्रिय केलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता अटी वाचण्याचा सल्ला दिला जातो. चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

IB Recruitment 2023
SBI Bank Recruitment 2023 : सरकारी खात्यात नोकरीची संधी! SBI मध्ये ८००० जागांसाठी पदभरती सुरु, कसा कराल अर्ज?

उमेदवार पात्रता आणि वय

सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/कार्यकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वयात सूट देण्याची तरतूद आहे.

निवड कशी होईल?

लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे या IB पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

IB Recruitment 2023
Agniveer Recruitment: तरुणांसाठी आनंदाची बातमी, अग्निवीर भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल; लष्करी अधिकाऱ्यांची माहिती

एकूण 995 पदांवर भरती केली जाईल

सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/IB च्या एक्झिक्युटिव्हच्या एकूण 995 पदांवर भरती केली जाईल. यामध्ये एकूण 377 पदे अन आरक्षित आहेत. तर 222 पदे OBC-NCL साठी, 134 SC साठी, 133 ST साठी, 129 EWS साठी राखीव आहेत. अर्ज करण्यापूर्वी, भरती सूचना काळजीपूर्वक वाचा. पोस्ट, पात्रता वयोमर्यादा यासारखी अधिक माहिती तेथे दिलेली असते.

पगार किती असेल

या पदांवर निवड केल्यास पगार चांगला असतो. मूळ वेतन 44,900 रुपये आहे आणि उमेदवारांना कमाल 1,42,400 रुपये प्रति महिना दिले जातील. यासोबतच त्यांना डीए, एसएसए, एचआरए, टीए अशा सर्व सुविधा मिळतील.

IB Recruitment 2023
MPSC Recruitment 2023 : नोकरीची सुवर्णसंधी! सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?

फी किती असेल

नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर पुरुष उमेदवार, UR, EWS आणि OBC श्रेणींसाठी 550 रुपये शुल्क आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com