Diabetes: महाराष्ट्रात १२ लाख लोकांना मधुमेहाचा आजार, मुंबईत सर्वाधिक रुग्ण; धक्कादायक सर्व्हे समोर

Diabetes Patients: बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
Diabetes
DiabetesSaam Tv
Published On

Diabetes Patients In Maharashtra:

बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होत आहे. यात डायबिटीजच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डायबिटीजचे रुग्ण वाढत असताना अनेक लोकांना त्यांना डायबिटीज आहे हे माहितच नाहीये.

एका रिपोर्टनुसार, राज्यातील 11.95 लाख लोकांना त्यांना डायबिटीज असल्याची माहिती नव्हती. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग (NCD) कार्यक्रमामुळे लोकांना त्यांच्या डायबिटीज आणि उच्च रक्तदाब असल्याचे समजले. पूर्वीच्या तुलनेत महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. असे निदर्शनास आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एनसीडी प्रोग्राम अंतर्गत २०२१ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात डायबिटीजची तपासणी करण्यात आली. 2021 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यात 2.09 कोटी लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 11.95 लाख लोकांना डायबिटीज असल्याचे समजले. यामध्ये १.०४ कोटी पुरुष आणि १.०५ कोटी महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 5.70 टक्के पुरुष आणि 5.73 टक्के महिलांना डायबिटिज असल्याचे समजले.

डायबिटीजच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर काळजी घ्यायला हवी. डायबिटीजचे लक्षण दिसल्यास दुर्लक्ष करु नये. लगेचच उपचार घ्यावे.

Diabetes
Children's Day Investment Plan: बालदिनानिमित्त चिमुकल्यांसाठी अशी करा गुंतवणूक, भविष्यात पैशांची चिंता भासणारच नाही!

डायबिटीजचे लक्षण

  • वारंवार लघवी येणे

  • जास्त प्रमाणात तहान लागणे

  • वजन कमी होणे

  • थकवा आणि चक्कर येणे

  • त्वचेची समस्या

  • कोणतीही जखम भरण्यास वेळ लागणे

डायबिटीजची अशी काळजी घ्यावी

  • पोषक आहार घेणे

  • स्ट्रेस कमी करण्यासाठी योगासने, मेडिटेशन, व्यायाम करणे

  • पुरेसी झोप घेणे

  • वेळेवर ओषधे घेणे

  • नियमित शुगर लेवल तपासणे

Diabetes
Health Tips: घसा खवखवतोय? हे घरगुती उपाय करा; नक्कीच आराम पडेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com