दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रदुषण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असताना दिवाळीत फटाक्यांच्या धुरांने यात अजूनच वाढ होताना दिसत आहे. या प्रदुषणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. अनेकांना सर्दी खोकला अशा समस्या होत आहे.
प्रदुषणामुळे घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्या वाढत आहे. यावर तुम्ही घरच्या घरी उपाय करु शकतात. आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन तुम्ही खोकला, घसा खवखवणे या आजारांवर उपाय करु शकतात.
1. तुळस
तुळस ही खूप जास्त गुणदायी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांमध्ये खूप जास्त गुणधर्म असतात. तुळशीचे पाणी प्यायल्याने घशाच्या समस्या दूर होतात. तुम्ही हे पाणी लहान मुलांनादेखील देऊ शकतात. यासाठी तुळशीची पाणे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात उकळा. तुळशीच्या पानांचा संपूर्ण रस जोपर्यंत पाण्यात उतरत नाही तोपर्यंत उकळत राहा. हे पाणी प्या. शरीरास खूप फायदा होईल.
2. मसाला चहा
भारतात चहा हा सर्व कुटुंबामध्ये पिला जातो. चहा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. त्यात अनेक मसाले टाकू शकतो. ज्याचा आरोग्यास फायदा होईल. चहात काळी मिरी, तुळशीची पाने, दालचिनी, लवंग, गुलाबाची पाने, आले टाका. त्यामुळे आरोग्यास खूप फायदा होतो. चहात हे सर्व पदार्थ टाकून खूप वेग उकळा. त्यानंतर प्या.
3. मध
मध खालल्याने आरोग्यास खूप फायदे होतात. मधात अनेक अँटीबायोटिक गुणधर्म असतात. मध घसादुखी, खोकला आणि सर्दी या आजारांवर प्रभावी उपाय करतो.
4. हळद दूध
हळदीत खूप जास्त अँटीऑक्सिडंट असतात. हळदीतील गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. घसा खवखवत असेल तर हळदीचे दूध प्यावे. हळदीचे दुध पिल्याने जळजळ कमी होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.