Bad Chlorestrol: बॅड कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; रोजच्या जीवनात या गोष्टी करा, धोका होईल कमी

Bad Chlorestrol Food : शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल हे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरु शकते. त्यामुळे शरीरात काही आवश्यक बदल करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला रोजच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल.
Bad Chlorestrol
Bad ChlorestrolSaam Tv
Published On

Bad Chlorestrol Prevention :

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. सध्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाईट कोलेस्ट्रॉल हे यामागचे मुख्य कारण आहे. दरवर्षी हृदयविकाराच्या धोक्याने मृत्यू होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल हे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरु शकते. त्यामुळे शरीरात काही आवश्यक बदल करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला रोजच्या जीवनशैलीत बदल करावे लागतात. शरीरात काही आवश्यक बदल केल्याने खूप फायदा होतो.

वाईट कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?

व्यायाम

सध्या ज्याप्रकारे आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शारिरीक हालचाल करणे चांगले असते. परंतु लोक सध्या जास्त काळ लॅपटॉपसमोर काम करत असतात. याचा त्रास त्यांना भविष्यात होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरेल. रोज व्यायम केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. याशिवाय शरीराला खूप जास्त फायदे होतात.

पौष्टिक अन्नपदार्थ

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा आपल्या हृदयावर खूप जास्त परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याती जास्त शक्यता असते. त्यामुळे पोषण पदार्थांचे सेवन करावे. जेवणात फळे, पालेभाज्या यांचा समावेश करावा. जंक फूडचे सेवन टाळावे. तुम्ही फायबरयुक्त, ओमेगा ३ फॅटी अॅसिडने परिपूर्ण पदार्थांचा जेवणात समावेश करावा.

Bad Chlorestrol
Eye Exercise : स्क्रीन टाइमच्या वापरामुळे डोळे थकले, सतत पाणी येतेय? Office मध्ये बसल्याजागी करा ही योगासने, मिळेल आराम

वजन कमी करणे

वजन कमी केल्याने तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करु शकतात. वजम कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

व्यसन करु नये

व्यसन केल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. व्यसन केल्याचा परिणाम तुमच्या ब्लड प्रेशर आणि फुस्फुसावरही होतो. हे हृदयासाठी हानिकारक ठरु शकते. तसेच दारु पिल्याने यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये.

Bad Chlorestrol
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार बेडरुममध्ये या गोष्टी ठेवूच नका! सतत सापडाल आर्थिक संकटात...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com