Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीर देत असलेल्या 'या' गंभीर आजाराचे संकेत वेळीच ओळखा!

Leg hair loss: हात-पाय सतत थंड पडणे, पायांवरील केस गळणे आणि जखमा लवकर न भरणे ही रक्तप्रवाह कमी होण्याची संभाव्य लक्षणे असू शकतात. रक्तपुरवठा कमी झाल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात आणि कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, जाणून घ्या.
Poor Circulation Symptoms
Poor Circulation Symptomssaam tv
Published On: 

हात-पाय सतत थंड पडत असतील तर अनेकदा आपण त्याकडे साधी समस्या म्हणून पाहतो. पण शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. शरीराच्या प्रत्येक भागाला पुरेसं रक्त मिळणं गरजेचं असतं. रक्तपुरवठा कमी झाल्यास त्वचेलाही त्याचा परिणाम जाणवू लागतो. त्वचेला पुरेसं रक्त न मिळाल्याने तिचं नुकसान होऊ शकतं. पायांवरील केस कमी होणं किंवा गळून जाणं हे देखील रक्तप्रवाह कमी झाल्याचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं.

पायांवरील केस गळणं धोक्याची घंटा?

पायांवरील केस नसणं अनेक महिलांना आवडतं. परंतु पायांवरील केस आपोआप कमी होत असतील किंवा गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याचं लक्षण असू शकतं. पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसेल तर केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे केसांची मुळं हळूहळू कमकुवत होतात आणि त्यानंतर केस गळू लागतात.

Poor Circulation Symptoms
Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

इम्पीरियल कॉलेज लंडनमधील रक्तवाहिन्यांचे तज्ज्ञ प्रोफेसर एल्यून डेविस यांच्या मते, पुरुषांमध्ये हे लक्षण अधिक स्पष्टपणे दिसून येतं. अनेक पुरुषांच्या पायांवर मोजे घातल्या जाणाऱ्या भागात केस दिसत नाहीत. याला 'सॉक लाइन' असं म्हटलं जातं.

पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसेल तर पुढे ही समस्या गंभीर होऊ शकते. यामुळे पायांमधील नसा आणि शरीरातील ऊतींचं नुकसान होऊ शकतं. मात्र सुरुवातीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास योग्य उपचार करता येतात.

व्हॅस्क्युलर चॅरिटीच्या माहितीनुसार, रक्तपुरवठा कमी होण्याच्या समस्येवर उपचार केले नाहीत तर पायांमधील ऊतींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे शरीरातील ऊती खराब होऊन मृत होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की रुग्णाचा पाय कापण्याची वेळही येऊ शकते.

Poor Circulation Symptoms
Breast cancer: ग्रामीण भागातील महिलांनो, स्तनात होणारे बदल दुर्लक्षित करू नका! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

दोन आठवड्यांत जखम बरी होत नसेल तर सावध व्हा!

पायांमध्ये रक्तप्रवाह योग्य नसल्यास त्याचा परिणाम जखम भरून येण्यावरही होतो. दोन आठवडे उलटूनही एखादी जखम बरी होत नसेल तर ते रक्तपुरवठा कमी असल्याचं लक्षण असू शकतं. अशा जखमा अनेकदा गुडघ्यांच्या आसपास किंवा पायांच्या खालच्या भागात दिसतात. या जखमांमुळे वेदना, खाज आणि सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. वारंवार जखमा होत असतील किंवा त्या लवकर बऱ्या होत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण वेळेवर उपचार न केल्यास जखमेतील संसर्ग वाढू शकतो.

एनएचएसच्या माहितीनुसार, काही गोष्टींची काळजी घेतल्यास पायांवर वारंवार होणाऱ्या जखमा टाळण्यास मदत होऊ शकते. यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. वजन नियंत्रणात ठेवा. नियमित व्यायाम करा. तसंच व्यायाम आणि पायांना पुरेशी विश्रांती देणं यामध्ये योग्य संतुलन ठेवा.

रक्तप्रवाह कमी असल्यास आणखी कोणते त्रास होऊ शकतात?

शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य पद्धतीने होत नसेल तर केवळ पायांवरच नाही, तर शरीराच्या इतर भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटदुखी, जुलाब आणि शौचातून रक्त जाणं अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे पायांवरील केस अचानक कमी होणं, जखमा लवकर बऱ्या न होणं किंवा सतत सूज आणि वेदना जाणवणं अशी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Poor Circulation Symptoms
Lemon water: सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणासाठी फायदेशीर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.