Hair Mask Remedy : ड्राय हेअर अगदी मुलायम आणि सॉफ्ट होतील; घरच्याघरी बनवा हा रामबाण उपाय

Hair Beauty : केसांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी घरच्याघरी तयार करा हेअर मास्क. कसा वाचा याची सिंपल रेसिपी.
Hair Beauty
Hair Mask RemedySaam TV
Published On

बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या केसांवर दिसतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतुंमध्ये केसांची विविध पद्धतीने काळजी घ्यावी लागते. केसांची निट काळजी घेतली गेली नाही तर केस कोरडे होतात आणि जास्त प्रमाणात पांढरे देखील होतात. केस अशा पद्धतीने खराब झाल्यास आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो.

Hair Beauty
Hair Tips: मजबूत केसांसाठी आहारात समाविष्ट करा 'या' ९ गोष्टी, सर्वच म्हणतील Wow

ड्राय हेअर सॉफ्ट आणि शायनी व्हावेत यासाठी व्यक्ती विविध प्रयोग करतात. काही जण शँम्पू आणि कंडिश्नर केसांवर लावतात. मात्र यानेही केस आणखी जास्त खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आज केसांची ही समस्या सोडवण्यासाठी एका हेअर मास्कची रेसिपी जाणून घेणार आहोत. हा हेअर मास्क घरच्याघरी बनवणे सुद्धा सोपं आहे. त्याचीच रेसिपी आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

दही - १ वाटी

केळी - १

फ्लॅक्स सीड्स जेल - ४ चमचे

आर्गन तेल - ४ चमचे

कोरफड जेल - १ चमचा

असा तयार करा केसांना सिल्की करणारा हेअर मास्क

सर्वात आधी वर दिलेलं साहित्य एकत्र घेऊन या. साहित्य वेगवेगळे एका वाटीत काढून घ्या.

सर्वात आधी दही एका सुती कापडात बांधून ठेवा. सुती कापडात बांधून दहीमध्ये असलेलं अतिरिक्त पाणी गाळून घ्या. पाणी गाळून झालं की एका मिक्सरच्या भांड्यात दही टाकून घ्या. त्यानंतर दह्यात एक केळी देखील मिक्स करा. दही आणि केळी मिक्सरला छान बारीक करून घ्या.

एका वाटीत फ्लॅक्स सीड्स भिजत ठेवा. फ्लॅक्स सीड्स भिजल्या की त्यातील पाणी या मिश्रणात मिक्स करा. तसेच यामध्ये आर्गन ऑइल आणि अॅलोवेरा जेल सुद्धा मिक्स करा आणि मिक्सरला बारीक करून घ्या. सर्व एकत्र करून या मिश्रणाची घट्ट आणि स्मूथ पेस्ट तयार करा.

केसांवर अप्लाय करताना मुळांपासून ही पेस्ट अप्लाय करावी. तसेच केस पूर्ण वाळल्यानंतर हेअर वॉश करावे. केस धुताना शँम्पू किंवा अन्य कशाचाही वापर करू नये.

Hair Beauty
Hair Colour : स्टायलीश लूकसाठी हेअर कलरचा विचार करताय? थांबा, आधी होणारे नुकसान वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com