Is it mandatory to give mobile number while shopping : सामान खरेदी केल्यानंतर लांबलचक रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर बिलिंग करण्याची वेळ आली की, कोणत्याही स्टोअरमध्ये आपल्याकडून दुकानदार आपली वैयक्तिक माहीती व मोबाइल नंबर मागतो. त्यामुळे एकतर आपण त्याच्याशी वाद घालतो किंवा गुपचूप त्याला तो मागेल ती माहीत देतो.
1. वैयक्तिक क्रमांकाशिवाय बिल बनवू शकत नाही.
ग्राहक व्यवहाराचे सचिव म्हणतात, विक्रेत्यांचे म्हणणे असे आहे की, जोपर्यंत वैयक्तिक क्रमांक देत नाही तोपर्यंत बिल बनवता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ही अनुचित आणि प्रतिबंधात्मक व्यापाराची प्रथा आहे. त्याची माहीती (information) गोळा करण्यामागे कोणतेही तर्क नसतात. त्यांना फक्त आपल्या माहीतीची गोपनीयतेची काळजी घेणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे, ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रिटेल उद्योग आणि उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि FICCI यांना नियम जारी करण्यात आला आहे.
आता देशात कोणत्याही ग्राहकाला बिल तयार करण्यासाठी विक्रेत्याला तुमचा मोबाइल नंबर देण्याची गरज नाही. बरेचदा विक्रेते व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपला नंबर मागतात त्यामुळे ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमानुसार आता ग्राहकांना खरेदी करताना कोणताही त्रास होणार नाही
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.