Government Job : 10 वी उत्तीर्णांना मिळतेय सरकारी नोकरीची संधी; 45 हजार रिक्त जागा, आजच अर्ज करा

या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

Government Job : नुकतेच १० वी पास झालेल्या उमेदवारांसाठी खूश खबर आहे. राज्यात कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 24,369 45,284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. (Govt. Job)

इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार अधिकृत साईट (Website) ssc.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Government Job
SBI Recruitment 2022 : स्टेट बँकेत मिळेतय परीक्षेशिवाय नोकरीची संधी; याप्रकारे करा अर्ज

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत CAPF, SSF, रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षा, 2022 मध्ये शिपाई च्या पदसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. SSC GD भरती च्या जागा वाढवून 24 हजार वरून 45000+ इतक्या करण्यात आल्या आहेत. नुकतेच १० वी पास झालेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

1. कोणत्या पदासाठी रिक्त जागा

45 हजार जागा कॉन्स्टेबल (GD)या पदासाठी रिक्त आहेत.

2. पद

या जागेसाठी पूर्वी सरकारने 24,369 इतक्या प्रमाणात मर्यादा ठेवली होती परंतु, सध्या 45,284 जागा आहेत

Government Job
Job Vacancy : बेरोजगारांसाठी खूशखबर! देशात सुशिक्षितांसाठी 10 लाख जागांची नोकर भरती; जाणून घ्या कोणत्या खात्यात किती जागा?

3. या जागेसाठी भरती

Job
Job Saam Tv

4. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

या नोकरीसाठी उमेदवार हा किमान दहावी पास असायला हवा व त्याचे वय वर्ष हे १८ ते २३ वयोगटातील असायला हवे.

5. अर्ज शुल्क किती

इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार अधिकृत साईट ssc.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच याची शुल्क ही १०० रुपये असेल

6. अंतिम दिनांक

या पदासाठी 27 ऑक्टोबर 2022 भरती प्रक्रिया सुरु झाली असून त्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com