SBI Recruitment 2022 : स्टेट बँकेत मिळेतय परीक्षेशिवाय नोकरीची संधी; याप्रकारे करा अर्ज

नुकतेच पास झालेल्या तरुणांना किंवा नोकरी गमावलेल्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती सत्र सुरु केले आहे.
SBI Recruitment 2022
SBI Recruitment 2022 Saam Tv
Published On

SBI Recruitment 2022 : सरकारी नोकरी म्हटलं की, अनेकांना प्रश्न पडतात. त्यासाठी घेतली जाणारी परीक्षा ही अधिक अवघड त्यात पास झाल्यानंतरही आपल्याला नोकरी मिळेल का हा प्रश्न तुमच्या आमच्यापैकी सर्वांनाच पडतो. अशातच नुकतेच पास झालेल्या तरुणांना किंवा नोकरी गमावलेल्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती सत्र सुरु केले आहे.

SBI मध्ये सध्या 65 पदांवर भरती होणार आहे. ही भरती मोहीम स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार SBI च्या अधिकृत साईट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तसेच ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

SBI Recruitment 2022
Job Interview Tips : जॉब इंटरव्ह्यूसाठी जाताय ? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर, नोकरी मिळेल नक्की !

1. किती जागा रिक्त

भरती केल्या जाणाऱ्या SBI च्या या जागेसाठी 65 जागा रिक्त आहेत. त्यात 64 पद हे व्यवस्थापक आणि 1 पद सर्कल सल्लागारासाठी आहे.

2. पात्रता

या पदासाठी आपल्याला SBI च्या अधिकृत वेबसाइट्सला (Website) भेट द्यावी लागेल. त्याच्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

3. निवड प्रक्रिया

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतींच्या आधारे केली जाईल.

  • या पदांच्या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

  • काही पदांसाठी मुलाखत 100 गुणांची असेल.

  • निवडीची गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.

SBI Recruitment 2022
Resume Writing Tips : रेझ्युमे बनवताना 'या' 6 गोष्टी लक्षात ठेवा, हमखास नोकरी मिळेल !

4. अर्जासाठी शुल्क

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावे लागेल.

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे.

  • SC/ST/PWD उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

  • बँकेच्या (Bank) करिअर वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पेमेंट गेटवेद्वारे फी ऑनलाईन भरावी लागेल.

5. अंतिम तारीख

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. तसेच शेवटची तारीख ही 12 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com