२ एप्रिलनंतर Google ची हे सेवा होणार बंद! आजच करा डेटा ट्रान्सफर

Google is shutting down this service : गुगलची पॉडकास्ट सेवा २ एप्रिल २०२४ पासून बंद होणार आहे. याविषयीची माहिती सप्टेंबर २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली होती.
Google is shutting down this service
Google is shutting down this serviceSaam tv

Google Podcast :

इंटरनेटच्या जगात आपल्यापैकी अनेकजण गुगलचा वापर करतात. यामध्ये क्रोमचा वापर करुन जगभरातील माहिती सहज मिळवू शकतो. गुगलच्या माध्यमातून आपली अनेक कामे सहज आणि सुलभ होतात.

अशातच गुगलची (Google) पॉडकास्ट सेवा २ एप्रिल २०२४ पासून बंद होणार आहे. याविषयीची माहिती सप्टेंबर २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली होती. तरी २ एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचा महत्त्वाचा डेटा गुगल पॉडकास्टवर असेल तर तुम्ही तो आजच YouTube Music वर ट्रान्सफर करायला हवा.

मिळालेल्या माहितीनुसार गुगल त्याचे पॉडकास्ट हे YouTube Music मध्ये ट्रान्सफर करत आहे. डेटा कसा ट्रान्सफर करायचा जाणून घेऊया

Google is shutting down this service
Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान! अनलिमिटेड कॉल्स, दिवसाला २ जीबी डेटा अन् फ्री Prime Video Subscription; ऑफर्स पाहा

1. YouTube Music वर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

  • सर्वात आधी गुगल पॉडकास्टच्या अॅपला भेट द्या.

  • त्यानंतर स्क्रीनवर असणारा Export Subscription पर्यायावर क्लिक करा.

  • नंतर एक्सपोर्ट टू युट्यूब म्युझिकवर दिसणारा एक्सपोर्ट पर्याय निवडावा लागेल.

  • त्यात तुम्हाला Continue पर्यायावर टॅप करावे लागेल.

  • सबस्क्रिप्शन पाहण्यासाठी Go To Library वर क्लिक करा.

Google is shutting down this service
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : नवीन महिन्यात या राशींना होईल अचानक धनलाभ, प्रेमसंबंधात येईल दूरावा

2. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इतर पर्याय

युजर्सला हे माहित असायला हवे की, सर्व पॉडकास्ट YouTube Music वर उपलब्ध नसतील. तसेच यामध्ये OPML फाइल डाउनलोड (Download) करून किंवा Google Takeout वरुन तुम्हाला डेटा ट्रान्सफर करता येईल.

मागच्या वर्षी गुगलने पॉडकास्ट संबंधित फीचर यू-ट्यूबमध्ये जोडले होते. यामुळे युजर्सला एकाच अॅपमध्ये गाणी आणि पॉडकास्ट ऐकता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com