Google Pay Roll Out : हल्ली पैसे पाठवणे, पेमेंट करणे एवढेच काय कर्ज घेण्यापासून गुंतवणुकीपर्यंत सर्वच बँकेची कामे ऑनलाइन झाली आहेत. हे कॅशलेस इंडिया कल्चर हळूहळू संपूर्ण भारतात पसरताना दिसते आहे.
अगदी ग्रामीण भागात देखील हे ऑनलाइन (Online) पेमेंट कल्चर पोहोचलेले पाहायला मिळतयं. आज बाजारात Google Pay, Phone Pe, Paytm सारखे अनेक ऑनलाइन पेमेंटचे अॅप्स उपलब्ध आहेत.
या अॅप्सने पेमेंट करण्यासाठी आपले बँकेचे खाते आणि डेबिट कार्ड असणे गरजेचे असते. याशिवाय आपण गुगल पे काय कोणत्याच अॅपवरून पेमेंट करू शकत नाही. परंतु, नुकत्याच झालेल्या बदलानुसार आता आपल्याला विना डेबिट (Debit) कार्ड 'गुगल पे' अॅक्टिव्हेट करणे शक्य झाले आहे. काय आहे ही नवी योजना आणि आपण कसे करू शकतो 'गुगल पे'वर आपले खाते अॅक्टिव्हेट जाणून घेऊयात सविस्तर.
आता आपल्याला 'गुगल पे' वापरण्यासाठी यूपीआय पिनची आवश्यकता नाही. गूगल पेकडून यूपीआय पेमेंट अॅक्टिव्हेट करण्यासाठी आधार-आधारित ऑथेंटिकेशनसाठी पाठिंबा देण्यात आला आहे. काल बुधवार 7 जून रोजी कंपनीकडून हे जाहीर करण्यात आले.
या योजनेनुसार, आता तुम्ही आपल्या आधार नंबरवर आपले गुगल खाते अॅक्टिव्हेट करू शकता. असे करताना तुम्हाला तुमच्या आधार (Aadhar) कार्डला आणि बँकेला लिंक असलेलाच मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे. तसेच व्हेरीफिकेशन प्रक्रियेकरिता कंपनी लोकांचे आधार नंबर मागणार नसल्याचे कंपनीडून स्पष्ट करण्यात आले आहे.
1. कसे कराल आधार कार्ड नंबर वरुन गुगल अकाऊंट अॅक्टिव्हेट?
गुगलकडून सांगण्यात आले आहे की, नवी आधार-आधारीत योजना वापरकर्त्यांना ऑथेंटिकेट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून लोक डेबिट कार्डशिवाय यूपीआयसाठी साइन अप करु शकतील. ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी वापरकर्त्यांना आपल्या आधार क्रमांकातील पहिले 6 अंक टाकावे लागतील. हे अंक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माध्यमातून UIDAI ला पाठवण्यात येणार आहे. असे कंपनीने सांगितले आहे.
2. बँक खाते आणि मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक
NPCI च्या वेबसाइटवरील माहीतीनुसार, सध्या 22 बँका आपल्या ग्राहकांना ऑथेंटिकेशनला पाठिंबा देत आहेत. गुगला अपेक्षा आहे की भविष्यात जास्तीत-जास्त बँका या योजनेला पाठिंबा देतील. ग्राहकांनी आधार कार्डने आपले खाते अॅक्टिव्हेट करण्यापूर्वी आपला मोबाइल नंबर बँकेच्या खात्याला आणि आधारला रजिस्टर आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.
3. आधार कार्डच्या नंबरला गुगलकडून साठवले जाणार नाही.
गुगल पे वर यूपीआयसाठी रजिस्टर करण्यासाठी ग्राहकाला त्याच मोबाइल नंबरचा वापर करावा लागणार आहे जो त्याच्या UIDAI ला रजिस्टर केला आहे. हा नंबर एकच असणे गरजेचे असते. यासंबंधित आणखी स्पष्ट होत गूगलने ग्राहकांची विश्वासार्हता टिकून राहावी याकरिता, आधार क्रमांक फक्त NPCI सोबतच शेअर केला जाणार असून तो कंपनीकडे स्टोर होणार नसल्याचे सांगितले आहे.
4. कशी पूर्ण होत ऑथेंटिकेशन प्रक्रिया?
मोबाइल नंबर आणि आधार नंबरचे सुरूवातीचे 6 अंक शेअर केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँक आणि UIDAI कडून एक वन-टाईम-पासवर्ड(ओटीपी) प्राप्त होईल. ते ओटीपी टाकल्यानंतर, ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर वापरकर्ते त्यांचा यूपीआय पीन सेट करून गुगल पे वरून व्यवहार सुरू करु शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.