Pan-Aadhar Linking Deadline : 30 जूनपूर्वी पॅनला आधारकार्डशी करा लिंक ! ऑनलाइन कसे कराल जाणून घ्या सविस्तर

Aadhar Pan link Online Process : आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
Pan-Aadhar Linking Deadline
Pan-Aadhar Linking DeadlineSaam Tv
Published On

Aadhar Pan Link : आधार कार्ड व पॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. अशातच केंद्र सरकारने ३० मार्चला आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.

परंतु, जर तुम्ही आधार कार्डला (Aadhar Card) पॅन कार्डला लिंक केले नसेल तर भविष्यात त्याचा उपयोग होणार नाही व तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. अद्यापही ज्यांच्याकडे आधार कार्डचा क्रमांक नसेल ते आयकर रिटर्न (ITR) भरताना आधार अर्जामधून नावनोंदणी आयडी नमूद करू शकतात. जर तुम्ही देखील अजून पर्यंत आधारला पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ऑनलाइन (Online) कसे कराल जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Pan-Aadhar Linking Deadline
Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा

पॅन कार्ड आधार कार्डशी ऑनलाइन कसे लिंक करावे?

1. आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

2. लॉगिन आयडी, पासवर्ड (Password) व जन्मतारीख घाला. त्यानंतर आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

3. यानंतर तुम्हाला एक कोड येईल तो तिथे भरावा लागेल.

Pan-Aadhar Linking Deadline
Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

4. साइटवर लॉग इन केल्यावर एक पॉप अप विंडो दिसेल ज्यावर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय मिळेल.

5. पर्याय न मिळाल्यास तुम्ही प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन Link Aadhaar बटणावर क्लिक करू शकता.

6. यानंतर नवीन पेजवर नाव, जन्मतारीख आणि लिंग असे काही तपशील टाका. ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी करताना हे तुमच्याद्वारे आधीच नमूद केले जाईल.

7. स्क्रीनवर दिलेल्या तुमच्या आधार कार्ड तपशीलांची पडताळणी करा.

Pan-Aadhar Linking Deadline
Aadhar-Bank Account Link : तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ? आता घरबसल्या कळेल, फॉलो करा स्टेप

8. तपशील जुळल्यानंतर, तुमचा आधार क्रमांक अॅड करा आणि आता लिंक बटणावर क्लिक करा.

9. यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झाल्याचा मेसेज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com